Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अंगनवाडी कार्यालया मार्फत बेबी कीट चे वाटप

Responsive Ad Here

नयन खरात @ प्रतिनिधि मेहकर


आज दिनांक.29.5.2020 ला अंगणवाडी कार्यालय सुकळी येथे  प्रथम प्रसूत माता सौ पूजा वैभव धांडे व शारदा गोपाल शिंदे यांना. सरपंच पती नितीन भाऊ नवले यांच्या हस्ते बेबी केअर किट देण्यात चे वाटप करण्यात आले. यावेळी अंगणवाडी  सेविका सुषमा घोडके व शकुंतला नवले तसेच मदतनीस लता कांबळे व शारदा मोरे उपस्थित होत्या. राज्य शासनाकडून एकात्मिक बाल विकास सेवा योजना मेहकर भाग एक अंतर्गत येणाऱ्या तसेच 1 फेब्रुवारी नंतर प्रथम प्रसूती झालेल्या. ग्रामीण भागातील महिलांना बेबी केअर कीट वाटप करण्यात येत आहे. बाळाची काळजी घेण्यासाठी ही बेबी केअर कीट अंगणवाडी स्तरावर अंगणवाडी सेविका मार्फत देण्यात येत आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील पात्र महिलांना अंगणवाडी सेविका कडे अर्ज  करावयाचा आहे. 

अर्जासोबत पात्र महिलेचे आधार कार्ड, लसीकरण कार्ड, व बाळाच्या जन्माचा दाखला जोडून अर्ज करून बेबी केयर किट प्राप्त करायची आहे. या योजनेचा लाभ प्रथम प्रसूती होणाऱ्या महिलांनी घ्यावा, असे आव्हान एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी सपकाळ साहेब यांनी केले. या किटमध्ये बाळासाठी कपडे, मच्छरदानी, खेळणी, थर्मामीटर, बिछाना, नेलकटर व बेबी मसाज ऑइल आदी साहित्य आहे. अंगणवाडी सुकळी येथील अंगणवाडी केंद्रांमध्ये एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी सपकाळ साहेब यांच्या मार्गदर्शनात सुकळी येथील अंगणवाडी सेविका सुषमा घोडके व शकुंतला नवले तसेच मदतनीस लता कांबळे शारदा मोरे यांनी किटचे वाटप केले