रवी मारोतकर @प्रतिनिधी अमरावती
दिनांक 22 5 2020 ला नांदगाव खंडेश्वर येथे बांधकाम कामगार फेडरेशनच्या वतीने सोशल डिस्टन्स सिंगचे पालन करून बांधकाम कामगारांच्या मागणीला घेऊन करण्यात आले आंदोलन त्यामध्ये प्रमुख मागण्या 1)करोणा च्या काळामध्ये काम बंद पडल्यामुळे सर्व बांधकाम मजुरांना महिन्याला सात हजार पाचशे रुपये मानधन मिळण्यात यावें 2) सर्व श्रमिक जनतेचे विज बिल हे माफ करण्यात यावे 3) सर्व घरकुलाचे कामे सरकारी कामे ही खुली करण्यात यावे जेणेकरून मजुरांच्या हाताला काम मिळेल.4) कामगार कायद्यामध्ये जो बदल केला त्याला रद्द करून कामाचा तास
हा 12 घंटे वरून 8 तास करण्यात यावा.5) रेतीचा हर्रास ताबडतोब करण्यात यावा व हार्डवेअर चे दुकाने हि सुरू करण्यात यावी जेणेकरून कामगारांना इमारती साठी लागणाऱ्या वस्तूची कमतरता भासणार नाही व हाताला काम मिळेल.6) राज्यभरातील सर्व कामगार ऑफिस मध्ये असलेले पेंडिंग अर्ज हे तात्काळ निकाली काढण्यात यावे.7) साहित्य खरेदी करण्यासाठी जे पाच हजार रुपये तीन वर्षांमध्ये एकदा दिल्या जाते ते सुरू ठेवण्याबाबत हा कायदा रद्द करता कामा नये. यावेळी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना ई-मेल द्वा
रे निवेदन देण्यात आले त्यावेळी कॉम्रेड प्रभाकर सहदेव शिंदे कॉम्रेड उषा शिंदे नरेश खराड सुभाष मोरे शिरस्कर विनोद सोनोने महाराज, अनिल बिटले मोहम्मद हरून, सतीश पेटकर, शोबित पाटील हे उपस्थित होते.
8) बांधकाम मजुरांना जे दोन हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळत आहे त्यामध्ये रेनीवल ची अट न टाकता हे आर्थिक सहाय्य सर्व नोंदीत कामगारांना देण्यात यावे.
8) बांधकाम मजुरांना जे दोन हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळत आहे त्यामध्ये रेनीवल ची अट न टाकता हे आर्थिक सहाय्य सर्व नोंदीत कामगारांना देण्यात यावे.

