Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

Responsive Ad Here
जितेश कारीया@हिवरखेड प्रतिनिधी

हिवरखेड येथील बस स्थानक जवळ राहणारे शेतकरी  गजानन विठ्ठलराव भड वय अंदाजे 58  वर्ष यांनी हिवरखेड सोनाळा रोडवर फोपसे यांच्या शेताजवळ निंबाच्या झाडाला गळफास लावून दिनांक 28 मे रोजी सकाळी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती पवन मनोहर भड यांनी हिवरखेड पोलिसांना दिली. त्यावरून हिवरखेड पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू

शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे.
मागील अनेक महिन्यांपासून लॉकडाऊन मुळे हॉटेल, रसवंती, सर्व व्यवसाय ठप्प झाल्यामुळे तसेच शेतीतही सततच्या नापिकीमुळे आलेल्या नैराश्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.शासनाने त्यांना तात्काळ मदत घोषित करावी अशी मागणी होत आहे.