Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शासन निर्णय असुनही बँकानी पिक-विमा रोखला कसा.लिड डिस्टीक मॅनेजरला स्वाभिमानीचा घेराव.

Responsive Ad Here

विष्णु आखरे पाटील @ मेहकर 

 
दि.२९ गेल्या दोन महीन्यापासुन शेतक-यांच्या खरीप सोयाबिन पिक-विम्याची रक्कम जिल्ह्यातिल राष्ट्रीयकृत बँकानी कर्ज खात्यात जमा केलली आहे.ती रक्कम विना विंलब शेतक-यांना देण्यात यावी अशी मागणी करीत स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर, जिल्हाध्यक्ष शाम अवथळे,जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले, यांनी  बुलडाणा कार्यालय गाठुन पिक-विमा प्रश्नावर लिड डिस्टीक मॅनेजरला दोन तास धारेवर धरले. शासन निर्णय असुन बँका शेतक-यांचा पिक-विमा कर्ज खात्यात रोखुन ठेवत असतील तर अशा बँक अधिका-यावर तात्काळ कारवाई करा अशीही मागणी या वेळी करण्यात आली. पिक विम्याच्या प्रश्नावर जो पर्यंत तोडगा निघणार नाही तो पर्यंत कार्यालय सोडणार नाही अशी आंदोलकांनी हट्टाची भुमीका घेतल्याने वातावरण चांगलेच तापले होते. दोन दिवसात शेतक-यांना दिलासा दिल्या जाईल असाच तोडगा काढण्यात येईल असे लिड डिस्टीक मॅनेजर यांनी दिलेल्या आश्वासनाने आंदोलन स्थगित करण्यात आले. कोरोणा रोगाच्या दहशतीच्या वातावरणात बँकानी शेतक-यांची खरीप सोयाबिन पिक-विम्याची रक्कम कर्ज खात्यात जमा करुण शेतक-यांनवर दुहेरी संकट निर्माण केले आहे. या लॉक डाउन मुळे संपूर्ण व्यवहार ठप्प झाले असुन विम्याच्या पैशासाठी शेतकरी बँकेत चकरा घालुन हैराण झाले आहेत. कारण पेरणीचे दिवस जवळ आल्याने शेतक-यांच्या चिंतेत अधिक भर पडत आहे. शेतक-यांना शेतीच्या मशागतीचे, रासायनिक खते, बी बियाणे, खरेदि करण्याकरीता शेतक-यानकडे पैसा नाही.
या महामारीच्या कोरोनाच्या  पार्शभुमीवर बँकानी शेतक-यांचा पिक-विमा शेतक-यांना न देता कर्ज खात्यात जमा केला हे पुर्णपने चुकिचे आहे. वास्तविक २२ मे २०१९ शासन निर्णया नुसार खरिप पिक विम्याची रक्कम कंपनिने बँकेला अदा केल्या नंतर ७ दिवसाच्या आत शेतक-यांच्या बचत खात्यात जमा करणे हे बँकेला बंधन कारक आहे. पंरतु ह्या बँका शासन निर्णयाचे उलंघन करीत असल्याचे पुर्णपने उघड झाले आहे. बँकाना शेतक-यांची पिक-विम्याची रक्कम कर्ज खात्यात जमा करण्याची कोणत्याही प्रकारची गरज नाही. त्यामुळे कर्ज खात्यात जमा केलेले शेतकऱ्यांचे  पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा करण्या करीता जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकाना तात्काळ निर्देशित करण्यात येईल असे आश्वासना या वेळी देण्यात आले. दोन दिवसात बँकानी रकमेचा वाटप न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना  जिल्हाभर आंदोलन करणार असा ईशारा निवेदनातुन देण्यात आला. या निवेदनावर स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर,  जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे,जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले, गणेश जुनघरे, पवन मेटांगळे, बालाजी टाले,संतोष मानवतकर. यांच्या स्वाक्षा-या आहेत.