नयन खरात @ तालुका प्रतिनिधी मेहकर
आज दि २९ मे २०२० रोजी ग्रामपंचायत कार्यालय नागझरी ता.मेहकर च्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते .यापूर्वीही पंचायत समिती मेहकर येथे संगणक ऑपरेटर संघटनेच्यावतीने व ग्राम घाटबोरी,कल्याणा, देऊळगाव साकर्शा,आणि वरवंड येथे ग्रामपंचायतच्यावतीने रक्तदान शिबीर आयोजित करून,एकूण २६७ बॅग रक्त संकलित केले गेले आहे. आज देखील ४० बॅग रक्त संकलित करण्यात आले.
एकीकडे कोरोनाचे संकट घोंगावत असतांना,त्याचा प्रतिबंध गावस्तरावर सुरू आहे.सोबत ईतर आजारांच्या पेशंटला रक्त कमी पडणार नाही,याची दखल देखील गावकरी घेत आहेत.सद्यस्थितीत रक्तदानासारखे सामाजिक उपक्रम राबविण्याची गरज आहे.. शासन स्तरावरून देखील,रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे आवाहन करण्यात येत
आहे.त्याअनुषंगाने मेहकर तालुक्यातील ग्रामपंचायत प्रशासनाचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे.
चोहीकडे सोशियल मीडियाच्या माध्यमातून लग्नाचे वाढदिवस साजरे होत आहेत.मात्र श्री शामभाऊ देवकर आणि सौ.कल्पनाताई शामभाऊ देवकर यांनी औपचारिकपणे लग्नाचा वाढदिवस साजरा न करता.. जोडीने रक्तदान करून लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे.सोबत
नागझरी येथील पुरूषांनी देखील मोठ्या प्रमाणात रक्तदान केले व तसेच महिलांनी देखील
रक्तदान करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे
सौ.गीता राजेंद्र देवकर सरपंच
नागझरी व ईतर महिला या सर्व महिला भगिनींचा ग्रामगीता देऊन सन्मान करण्यात आला या रक्तदान शिबिराला
शिबीराला डॉ.विशाल मगर वैद्यकीय अधिकारी
,राजुभाऊ देवकर,
गोसावी साहेब ग्रामसेवक,
,लहाने सर व येवले सर
उपस्थित होते..
आयोजकांचे व रक्तदात्यांचे अभिनंदन

