Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

स्वाभिमानी हेल्पलाईनच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..

Responsive Ad Here

विष्णु आखरे पाटील @ प्रतिनिधी मेहकर


दि. २८ देश आज कोरोनाच्या संकटात सापडला आहे. कोरोना रुग्णांसाठी रक्ताच्या संभाव्य तुटवड्याची सार्थ भिती व्यक्त होतेय. अशा परिस्थीतीत रक्तदानासाठी साद घातली जात असतांना रविकांत तुपकर यांच्या संकल्पनेतून स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरच्या माध्यमातून आज २८ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ये देश की पुकार है, रक्त की ललकार है' अशा शब्दात रविकांत तुपकर यांनी युवकांना रक्तदानाबाबत आवाहन केले होते. आवाहनाला प्रतिसाद देत तरुण-तरुणी, कार्यकर्ते, शेतकरी, शिक्षक, पत्रकार, महिला यासह विविध क्षेत्रातील नागरिकांनी या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सव्वाशेहून अधिक दात्यांनी रक्तदान करुन कोरोनाच्या या संकटकाळी आपली मदतीची भूमिका निभावली.

    कोरोना संकट काळात गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, कामगारांसाठी सर्व प्रकारच्या मदतीसाठी धावून गेलेल्या 'स्वाभिमानी' हेल्पलाईन सेंटरच्या माध्यमातून गुरुवारी २८ मे रोजी चिखली रोडवरील सोसायटी पेट्रोल पंपासमोर शबनम कॉम्प्लेक्स परिसरात 'कोरोनाला हरवूया, चला रक्तदान करूया' या संदेशासह 'स्वाभिमानी'चे राज्य नेते रविकांत तुपकर यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे #उद्घाटन करण्यात आले. इतरांना उपदेश करण्यापेक्षा आधी स्वत:पासून सुरुवात करण्याचे तत्व रविकांत तुपकर यांनी जोपासले आहे. त्यामुळे रक्तदानाची सुरुवात देखील त्यांनी स्वत:पासून केली. रविकांत तुपकर व त्यांच्या पत्नी ॲड.शर्वरीताई तुपकर यांनी सर्वप्रथम रक्तदान केले आणि त्यानंतर रक्तदानासाठी युवक-युवतींची अक्षरश: रांग लागली होती.
 तरुणी व महिलांचा उत्साही सहभाग
आजच शहरात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे त्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण आहे. मात्र असे असतांनाही ‘स्वाभिमानी’ हेल्पलाईन सेंटरच्या माध्यमातून आयोजित रक्तदान शिबीराला तरुणी आणि महिलांचा उत्साही सहभाग दिसून आला. तरुणी आणि महिलांनी स्वत:हून पुढाकार घेत रक्तदान केले, शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी 'स्वाभिमानी'च्या उपक्रमाचे कौतुक करण्यासह यापुढे तरुणी आणि महिलांनी कोरोनाच्या संकटाकाळी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन देखील केले.

प्रत्येकास मास्क व सॅनेटायझरचे वाटप
रविकांत तुपकर यांच्या संकल्पनेतून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत रक्तदान शिबिर पार पडले. युवक, युवती, महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी प्रत्येकाला मास्क आणि सॅनेटायझरचे वाटप करण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन सर्वांनी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने रक्तदान केले. रविकांत तुपकर यांनी सपत्नीक स्वत:पासून रक्तदानास केलेली सुरुवात, प्रत्येक रक्तदात्यास मास्क व सॅनेटायझरचे वाटप या उत्कृष्ट नियोजनाबाबत बाबत जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी ‘स्वाभिमानी' हेल्पलाईन सेंटरचे कौतुक केले.