Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पाळधी येथे मारुती कारसह २लाख३४हजाराची देशी- विदेशी दारू जप्त; पहुर पोलिसांची कामगिरी

Responsive Ad Here
जळगाव प्रतिनिधी @गणेश पांढरे

जामनेर तालुक्यातील पहुर जवळच असलेल्या पाळधी येथील जामनेर रस्त्यावर धरणाच्या भिंती जवळ आज दुपारी दुपारी१२वाजेच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझूकी कार मध्ये दारू ची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पहुर पोलिसांना मिळाल्या वरुन सदर कारची झडती घेतली असता २लाख३४हजार रुपये किमती ची देशी-विदेशी दारू मिळून आली.दारू साठ्यासह मारुती सुजूकी कार जप्त करण्यात आली असून आरोपी स अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की लाँकडाऊन काळात अवैध दारू विक्री व्यवसायात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली होती. सर्वत्र या आशयाच्या बातम्या येत होत्या. या बातम्यांची पहुर पोलिस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक राकेश सिंग परदेशी यांनी तात्काळ दखल घेत गुप्त माहिती वरून पाळधी येथील जामनेर रस्त्यावर असलेल्या हिजरा नाला जवळील भिंती जवळ पांढऱ्या रंगाची मारुती सुझूकी क्रमांक एम.एच.४३एबी५६३६या कारची झटती घेतली असता मागील डिकीत व सिटखाली देशी-विदेशी दारु,बिअर एकुण,कारसह २लाख३४हजार रुपये किमती चा मुद्दे माल जप्त करण्यात आला. आरोपी संदिप जालमसिंग पाटील(वय३२)रा.ओझर बु:ता.जामनेर याच्या विरुद्ध पहुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व आरोपी स  अटक करण्यात आली आहे.


ही कारवाई सहा. पोलिस निरीक्षक राकेश सिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल देवटे, सहा. फौजदार अनिल अहिरे, जितेंद्र परदेशी, अनिल सुरवाडे, चालक संजय सोनवणे या पथकाने केली. या कारवाई ने अवैध दारू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. तर कारवाई चे समाजात स्वागत होत आहे.