किरण वाघ @ जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
मासिक पाळी ही स्त्रियांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळे स्त्रिला मातृत्वाचा अनुभव घेता येतो. मात्र आपल्याकडे याबाबत पूर्वीपासून अनेक गैरसमज पसरले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 28 मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून जाहीर केला आहे.
हा दिवस अनेकांना माहित नसला, तरीही जागतिक स्तरावर त्याला फार महत्त्व आहे. समाजातील मासिक पाळीबाबत गैरसमज दूर व्हावेत, या दृष्टीने ‘UNICEF’ (United Nations International Children’s Emergency Fund) या संस्थेने एक अभियान राबवले आहे. या अभियानाला सोशल मीडियावर जोरदार पाठिंबा मिळत आहे.
मासिक पाळी हा चार चौघात न बोलण्याचा विषय… त्यामुळे पाळीविषयी खुलेआम चर्चा होत नाही. मेडिकलमध्ये सॅनिटरी नॅपकिनही दबक्या आवाजात मागितलं जातं. मेडिकलमध्ये काम करणारे कर्मचारीही अगदी सोनं दिल्याप्रमाणे ते अगदी कागदात गुंडाळून देतात. कशाला हवी एवढी लपवा-छपवी…
मासिक पाळी ही स्त्रियांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळे प्रत्येक स्त्री परिपूर्ण होते. मात्र शहरात तसेच खेडेगावात मासिक पाळीबाबत अनेक गैरसमज पसरले आहे. सामाजिक स्तरावर हे गैरसमज दूर करण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले जातात. मात्र या प्रयत्नांना शक्य तितकं यश आलेलं नाही
मासिक पाळी ही स्त्रियांच्या शरीरात होणाऱ्या बदलांपैकी एक महत्वाची आणि तेवढीच नैसर्गिक क्रिया आहे. यावर सार्वजनिक रुपात चर्चा करणं त्या टाळतात. महिलांना हे माहिती असायला हवं की, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कोणत्याही
अंधविश्वासावर विश्वास न ठेवता मासिक पाळीची वैज्ञानिक माहिती घेणं आवश्यक आहे. मासिक पाळी ही तिच्या स्त्रीत्वाची ओळख आहे, त्यामुळे प्रत्येक स्त्रीने तिचे हे स्त्रीत्व सेलिब्रेट नक्की करायला हवं.....
