Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 21 वा वर्धापन दिन ध्वजारोहण करून कोरोना योद्ध्यांचा सत्कार करून साजरा करण्यात आला

Responsive Ad Here
काशिनाथ शिंदे @प्रतिनिधी जामनेर तालुका

आज दि १० कोरोनाच्या पार्श्वभूमीवरराष्ट्रवादी काँग्रेसच्या २१ व्या वर्धापन दिन राज्यभरात साजरा होत असताना अत्यंत साधे पणाने वर्धापन दिन साजरा करण्यात येत असून प्रत्येक ठिकाणी सामाजिक कार्यक्रम व रक्तदान शिबिर सारखे कार्यक्रम करण्यात आले आहे.
जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाचोरा रोड वरील कार्यालयात तालुक्याचे नेते संजय दादा गरुड यांच्या हस्ते पक्षाच्या झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले.तसेच कोरोनाच्या काळात आपल्या स्वतः च्या व परिवाराची पर्वा 

 करता रात्रंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना योद्धा म्हणून आपली कर्तव्य पार पाडीत असलेले जामनेर तालुक्याचे प्रशासकीय अधिकारी तहसीलदार अरुण शेवाळे ,जामनेर पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे ,नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातिल डॉ आर के पाटील यांच्या कार्यालयात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील,विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, वैद्यकीय आघाडीचे डॉ. प्रशांत पाटील, शैलेश पाटील, प्रल्हाद बोरसे,पप्पू पाटील ,डॉ बाजीराव पाटील , संदीप हिवाळे, यांच्या सह विविध सेल चे तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यक्रमा वेळी शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करीत पक्षाचे कार्यकर्ते करण्यात आले.