आकाश जाधव @ शिर्डी प्रतिनिधी
लाँकडाऊन शिथीलतेनंतर हैदराबाद ते शिर्डी विमानाचे आज शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. या विमानातून 43 प्रवासी झाले असून यामध्ये दोन बालकांचा समावेश होता. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर देशाच्या विविध भागांमध्ये हे प्रवासी अडकून पडले होते. सर्व प्रवाशांना आगमनावेळी सॅनिटायझर पुरविण्यात आले. तसेच त्यांच्या बॅगा व इतर सामानाचे औषधी द्रव्याने निर्जंतुकीकरण करण्यात आले.
नाशिक, औरंगाबाद तसेच अहमदनगर जिल्हयात वास्तव्य करणारे हे नागरिक आहेत. प्रवाशांच्या आगमनाबद्दल तालुका प्रशासनातर्फे संबधित प्रशासनाला माहिती देण्यात आली. शिर्डीहून हैदराबादला जाणाऱ्या परतीच्या विमानाने 28 प्रवासी रवाना झाले. उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, कोपरगांवचे तहसीलदार योगेश चंद्रे व अन्य अधिकारी यावेळी विमानतळावर उपस्थित होते. कोपरगांवच्या विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली आव्हाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे यांचे
मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन बडदे, विमानतळ वैद्यकीय अधिकारी डॉ.तेजस्वी शिंदे, आरोग्य सेवक दिपक एकबोटे, आरोग्य सेविका अंजुम पठाण यांच्या पथकाने प्रवाशांची आगमनावेळी वैद्यकीय तपासणी केली. आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके, सहाय्यक शिक्षक सजन पोकळे, राजू सोनवणे यांनी पथकाला सहकार्य केले. टर्मिनल व्यवस्थापक मुरली कृष्णा,सीआयएसएफचे डेप्युटी कमांडर दिनेश दहिवाडकर यांनी विमानतळावरील सुविधा उपलब्ध करुन दिल्या.


