वैभव रोकडे@ प्रतिनिधी नांदुरा ग्रामीण
बुलढाणा:-महाराष्ट्र शासनाचा 13 कोटी वृक्षारोपणाच्या उपक्रमाअंतर्गत शाळेत व शाळेच्या परिसरात अनेक झाडे लावली असून यावर्षी सुद्धा शाळेकडे येणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा झाडे लावुन त्याची वृक्षसंवर्धनाची जबाबदारी बोराखेडी येथील मुख्याध्यापक अनिल चव्हाण व विद्यार्थ्यांनी घेतली आहे. पर्यावरण दिनाचे मागील वर्षी लावलेली याच झाड आजही जिंवत आहे व सातत्याने पर्यावरण दिनाला वृक्षारोपण मुख्याध्यापक करत आहे. सध्या कोरोना महामारीचे संकट जरी असले तरी निसर्ग हा आपला रक्षक आहे तो मानवी जिवन आनंदी व सुरक्षित ठेवण्यासाठी सतत आपल्याला मानवाला मदत करत असतो, तसेच सृष्टीच्या महामारीवर मात करण्याची ताकद निसर्गातच आहे म्हणून आता पावसाला सुरवात होणार असुन पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या परिसरात एका झाडाचे तरी वृक्षारोपण करण्याची गरज असल्याचे आव्हाहन मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी केले आहे. पर्यावरण दिन,कृषी दिन तसेच बोराखेडी शाळेत
नेहमी शिक्षक वाढदिवस व थोर पुरुष जयंतीनिमित्त झाडे लावून त्यांचे संगोपन करण्यात येत आहे यामुळेच शाळा वनराईने नटल्या सारखी निसर्गरम्य दिसत आहे.आज पर्यावरणदिन तसेच वटपौर्णिमा या दुग्धशर्करा योगायोगाने लावलेल्या झाडाला ट्रि गार्ड लावून त्या झाडांचे संगोपन करण्यात येणार असुन कृषिदिनाला शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना एक वृक्ष वाटप करून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण जनजागृती करून संगोपनासाची जबाबदारी देण्यात येणार आहे . यावेळी अंगणवाडी सेविका अनिता धोरण शालीग्राम डुकरे व विद्यार्थी उपस्थित होते.
