Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अभिनेता सुशांत सिंग गेल्याच दुख: अनावर- लेखिका आणि समाजसेविका सौ.शितल जुनघरे

Responsive Ad Here
कल्याण प्रतिनिधि @ संतोष वेंदे
           
          मन च मानायला तयार नाही कि सुशांत तु कुठे तरी परत कधीच न येण्यासाठी निघून गेलास. पण का.?
         जीवन जगत असताना असे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात जेव्हा आपण एकटे सर्व समस्यांशी लढत असतो. पण त्या वेळी फक्त आणि फक्त आई बाबांचा विचार मनात आला की सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. 
       तुझ्या मनातील बंद दरवाजा का उघडला नाही? 
            सुशांत  तुझ्या आठवणींच्या ठेव्या मध्ये सैरावैरा धावणाऱ्या हरना सारखे तुझे बाबा  ह्रदयाच्या कप्प्यात तुझं अस्तित्व शोधत आहेत. एवढ्या मोठ्या कळपातुन माझं पिल्लू का हरवलंय म्हणून जिवाच्या आकांताने तुला तुझे बाबा हाक मारत आहेत . का नाही ओ देत तु  पिल्ला? का सोडून गेलास आम्हा सर्वांना या दुःखाच्या ज्वालामुखीत. तुझ्या लाडक्या जनमानसांना कायमच सुनं करून गेला. का ? का? का? 
            
घरातला दिव्यज्योती होतास तु पण आज मात्र तिथे अंधाराच काहूर आलयं . बाबांच्या पाखरा ला आज कुणी तरी घेऊन गेलं काळीज फोडुन , पण तु मागे सुद्धा वळुन पाहीले नाही. व या दुःखाच्या अथांग सागरात सोडून  गेलास



सुशांत

ह्रदयाच्या कप्प्यात साठवून ठेवलेल्या पाखरांच्या पाऊलखुणा अचानक निघून गेल्या,
      हवेच्या मंद झुळुक स्पर्शाने          
         दिसेनाश्या झाल्या......

सैरावैरा धावलं मन तरी नाही आल्या,
           हवेच्या मंद झुळुक 
           स्पर्शाने आपल्याला विसरून 
            गेल्या......

उठलेल्या विरहाच्या काहुराने सप्तगंगा आठल्या ,
           हवेच्या मंद झुळुक
           स्पर्शाने कुठे तरी 
            विरुन गेल्या......

काय झाले कळेना की ना चुका उमगेनात,
           हवेच्या मंद झुळुक 
            स्पर्शाने पाखरा तुझ्या भेटीच्या 
               वाटा बंद झाल्या.......

        सुशांत तुझ्या ह्या अचानक जाण्यान शरीरातील सगळी हाडचं गळून पडलीरे .परतीच्या मार्गाने ये आई - बाबांच्या पाखरा. तु परत ये.....