Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बियाणांबाबत तक्रारी असतील तर कृषीला कळवा -दाते

Responsive Ad Here

नेवासा प्रतिनिधी सागर रासकर 

अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत ७० टक्के खरिपाच्या पेरण्या उरकल्या आहेत.   खरीप हंगामावर कृषी समितीची सभा    पावसाचे प्रमाणही चांगले आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी पिके
उगवणीबाबत तक्रारी झाल्या आहेत. बियाण्यांबाबत तक्रारी असतील तर शेतकऱ्यांनी तत्काळ कृषी विभागालाकळवावे, असे आवाहन कृषी व बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी केले आहे. शुक्रवारी कृषी समितीची सभा दाते यांच्या अध्यक्षतेखाली होऊन त्यात खरिपाच्या पार्श्वभूमीवर
उपलब्ध बियाणे, खते, पर्जन्यमान, पीक पेरणी व पीक परिस्थिती असा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात ५ लाख ८३ हजार क्षेत्र यंदा खरिपासाठी प्रस्तावित असून पैकी ३ लाख


 क्षेत्रावर(७० टक्के) पेरणी झालेली आहे.खरिपासाठी एकूण ५७ हजार ७२० क्विंटल बियाणांची व २ लाख १८ हजार मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ५० हजार क्विंटल बियाणे व १ लाख ५९ हजार टन खते उपलब्ध झाली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ३८ टक्के पाऊस झाला आहे. परंतु सोयाबीन, बाजरी व इतर बियाणे उगवले नसल्याच्या ४१८ तक्रारी प्राप्त झाल्या असून पैकी १४२ तक्रारींची तालुकानिहाय पथकामार्फत पाहणी करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार तक्रार निवारण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. महाबीज प्रतिनिधींनी तक्रारीअसल्यास तक्रार बियाणे बदलून द्यायचे आहे. आजअखेर श्रीरामपूरतालुक्यात १.६२ क्विंटल बियाणे बदलून दिले आहेत.