मेहकर प्रतिनिधी @विष्णु आखरे पाटील
भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून त्यांच्या पुतळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दहन करण्यात आले भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या बद्दल तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत सर्व स्तरातून गोपीचंद पडळकर यांचा निषेध करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर मेहकर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 24 जून रोजी मेहकर येथील तहसील चौकामध्ये भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आले व भाजपाचा व आमदार गोपीचंद पडळकर यांचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मेहकर विधानसभा अध्यक्ष पुरूषोत्तम पाटील पडघान ,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गजानन सावंत, जिल्हा उपाध्यक्ष गिरधर पाटील ठाकरे, शहराध्यक्ष निसार अन्सारी, तालुका उपाध्यक्ष राजेश पाटील नवले ,कैलास सावंत, विलास बचाटे, संदीप गव्हाड, दत्ता पाटील घनवट, भागवत लहाने ,गजानन काळे, रितेश सुर्वे, पवन सावंत ,प्रथमेश झनक, शंकर बापू देशमुख ,ज्ञानेश्वर काळे, इरफान अंसारी ,रहीम भाई, अफरोज अली ,सद्दाम गवळी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते