Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सुनगांवासी शेतकऱ्यांचे उपोषण बँक अधिकाऱ्याच्या लेखी आश्वासनाने शेतकऱ्यांचे उपोषण मागे

Responsive Ad Here


शिवदास सोनोने जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड प्रमाणीकरण झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना जामोद येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक चे शाखा प्रबंधक शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊन जून महिन्याचे ऐवजी ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात पिक कर्ज देऊ असं सांगत आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यावर आर्थिक संकट आलेले आहे
पावसाळा लागला की शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो मग ते शेतीची मशागत असो की बी बियाने असो कि रासायनिक खत असो अशा सर्व गोष्टीसाठी शेतकऱ्याला पैसे मोजावे लागतात आज शेतकऱ्यांची परिस्थिती अशी झालेली आहे की शेतकऱ्यांच्या घरी खाण्यासाठी पैसे नाही तर तो शेतीमध्ये लावण्यासाठी पैसा कुठून आणणार असे मोठे संकटच शेतकऱ्यांसमोर आज उभे ठाकलेले आहे

जामोद सर्कल हे पीक कर्जासाठी विदर्भ कोकण ग्रामीण बँक जामोद च्या अंतर्गत येत आहे ह्या बँकेचे शाखा प्रबंधक शेतकऱ्यांना दररोज हेलपाटे मारायला लावतात कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्व  वाहने बंद आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना बँकेत जायचे असल्यास त्यांना पायी जावे लागते ह्यासाठी ग्रामीण बँकेने सुनगाव येथे नवीन पीक कर्ज  वाटपासाठी  मेळाव्याचे आयोजन करून शेतकऱ्यांची होणारी पायपीट थांबवावी
जूनमध्ये जे पीक कर्ज शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे ते पिक कर्ज ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात देण्याचा निर्णय बँकेचे शाखा प्रबंधक यांनी घेतलेले आहे तो निर्णय रद्द करून सदर पिक कर्ज जून महिन्यातच देण्यात यावे अश्या विविध मागण्या घेऊन सुनगाव जामोद येथील शेकडो शेतकरी स्थानिक उपविभागीय कार्यालय येथे  दिनांक 8 जून 2020 पासून आमरण उपोषणाला बसले होते .परंतु अवघ्या काही तासातच बँकेचे अधिकारी व नायब तहसिलदार खाडे यांच्या लेखी आश्वासनाने उपोषण मागे घेण्यात आले.


या उपोषणामध्ये प्रमुख्याने अशोक काळपांडे,महादेव धुर्डे, पुंडलिक पाटील ,मोहनसिंग राजपूत ,रमेश कोथळकर संतोष भगत ,शंकर मिसाळ ,विजय राऊत ,तुकाराम ढगे  रामकृष्ण कोथळकार,नामदेव ढगे,पुंजाजी धुळे,वामण सोनोने, सखाराम मिसाळ, निनाजी ताडे,अर्जुन धुळे,गोपाल ढगे, किसन दामधर,गोविंदा राऊत यांच्यासह बहुसंख्य शेतकरी आमरण उपोषणला बसलेले होते