Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आधार प्रमाणीकरण सीएससी सेंटरवरून करून घ्यावेजिल्हा प्रशासनाचे आवाहन

Responsive Ad Here
नंदकिशोर इंगळे @प्रतिनिधी अमरावती 

अमरावती, दि. 18 : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत लाभार्थ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. ज्या शेतक-यांचे अद्यापही प्रमाणीकरण झालेले नाही, त्यांनी आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी सेंटरवर जाऊन प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी केले आहे.

आधार प्रमाणीकरणासाठी यादी प्रत्येक गावातील ग्रामपंचायत, बँक शाखा, आपले सरकार सेवा केंद्र व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था येथे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानुसार आधार प्रमाणीकरण  न झालेल्या शेतक-यांनी सेवा केंद्रावर बँक पासबुक, आधारकार्ड व विशिष्ट क्रमांक सोबत घेऊन जावे. आधार प्रमाणीकरणासाठी सर्व संबंधितांनी कोविड-19 पासून बचावासाठी दिलेल्या दिशानिर्देश व सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

                      महापालिका क्षेत्रात येणे शक्यतो टाळ अमरावती महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनी महापालिकेच्या क्षेत्रात आधार प्रमाणीकरण करण्यासाठी येण्याचे शक्यतोवर टाळावे. आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी सेंटरवर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.