प्रतिनिधी रवि मारोटकर नांदगाव खंडेश्वर
नांदगाव खंडेश्वर / तालुक्यात गेल्या कित्येक दिवसापासूण अवैध रेतीची वाहतूक सुरु असूण तालुकावासी कोरोनामुळे त्रस्त असतांना तहसिलदार भोसले मात्र रेती तस्करीला उधाण देत आहे . लाखो रुपये अवैध रेती तस्करांकडून हप्ता वसुली'घेत असूण मोठ्या प्रमाणात नदीच्या पात्रात खड्डे खोदले आहे याची चौकशी करूण तहसिलदार भोसले यांचे निलंबण करण्याची मागणी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश मारोटकर यांनी विभागीय आयुक्त यांचेकडे तक्रार करुण केली आहे . नांदगाव खंडेश्वर तालुक्यात कोरोणाचा प्रार्दुभाव पसरलेला असल्यामुळे तालुकावासी त्रस्त झाले असताना बेंबळा नदीच्या पात्रातून पहूर, जावरा , शिवणी , धामक , चिखली , येवती , फुबगाव, मंगरुळ चवाळा या ठिकाणाहून सर्रासपणे अवैध रेतीची खुलेआम चोरी सुरु असताना याची परिपूर्ण माहिती तहसिलदार भोसले यांना असतांना आर्थिक देवाण - घेवाण केली असल्यामुळे जाणीवपूर्वक डोळेझाक करित आहे . नदीच्या पात्रात रेती तस्करांनी JCB ने रेतीचे उत्खनन केल्यामुळे मोठ - मोठे खड्डे पडले आहे . त्यापासून धोका सुध्दा निर्माण झाला आहे . नदित अवैध रेतीचे साठवण्यात आलेले ढीग कागदोपत्री मर्जितील रेती तस्कराला कंत्राट देउण थातुर - मातुर कार्यवाही करण्यात येते . आणि अवैध रेती सस्कारी केल्या जाते. कोरोणा संक्रमणातील लॉकड़ाऊणच्या काळात शहरासह, ग्रामीण भागात बांधकाम व रेती उत्खनन चे कंत्राट बंद असताना या दरम्याण शेकडो बांधकाम कुठली रेती आणून करण्यात आली असा प्रश्ण निर्माण होतो . बांधकाम झालेल्यांची चौकशी केल्यास सत्यता उघड होईल आणि शासणाच्या करोडो रूपये महसुल बुडाल्याचे उघड होईल नदीच्या पात्राची पाहणी करूण याला सर्वस्वी जबाबदार असणाऱ्या तहसिलदार भोसले यांचे निलंबण करावे अशा मागणीची तक्रार युवा सेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश मारोटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , राज्यमंत्री बच्चू कडू , महसूल मंत्री , विभागीय आयुक्तासह महसुलचे प्रधान सचिव यांचेकडे केली असूज कार्यवाही न केल्यास आंदोलणाचा इशारा सुध्दा दिला आहे.
चौकशी करुण तहसिलदार यांचेवर कार्यवाहीचे विभागीय आशुक्तांचे निर्देश लॉकड़ाऊणमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्याऐवजी - रेती तस्करांना रेती चोरण्यास सहसिलदार भोसले यांनी लाखो रुपये घेऊण अवैद्य रेतीला चोरीला उधाण दिले . त्यामुळे शासनाच्या लाखो रुपये महसुल बुडाला आहे म्हणून विमागीय आयुक्त यांचेकडे तक्रार करुण कार्यवाहीची मागणी केली व तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले असल्याचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश मारोटकर यांनी सांगितले.

