Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

एस.सी.प्रवर्गातून "उज्वल" नवोदय मध्ये जिल्ह्यात प्रथम जि.प.शाळा,वारखेडच्या विद्यार्थ्याने राखली परंपरा कायम

Responsive Ad Here


 जितेश कारिया@ प्रतिनिधी हिवरखेड  

नुकत्याच जाहीर झालेल्या जवाहर नवोदय परीक्षेच्या निकालात जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा वारखेड येथील वर्ग पाचवीचा विद्यार्थी चि.उज्ज्वल राहुल वानखडे याने शाळेची परंपरा कायम राखत जवाहर नवोदय विद्यालय,बाभूळगाव येथे आपले स्थान निश्चित केले आहे.


विशेष म्हणजे उज्ज्वल हा एस.सी प्रवर्गातून जिह्यात प्रथम आला आहे. तसेच वारखेड शाळेचे अनेक विद्यार्थी आज नवोदय मध्ये शिक्षण घेत आहेत हे उल्लेखनीय. उज्ज्वल हा आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक मनीष गिऱ्हे, वर्गशिक्षीका सौ.संध्या व्यवहारे, आई वडील व शाळेतील शिक्षक गजानन ताडे, प्रशांत खुमकर, शैलेंद्र भोपळे, सौ.सुमित्रा उगले, सौ.रजनी ढोकणे, कु.विजया खंडारे, कु.मेघा होरे यांना देतो.