Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बळीराजाला सन्मानाची वागणूक द्या-आ.संजय रायमुलकर

Responsive Ad Here
नयन खरात@ प्रतिनिधी मेहकर

 दि. ११  बळीराजा (शेतकरी) हा जगाचा पोशिंदा असून त्याची हेळसांड न होऊ देता त्याला सन्मानाची वागणूक द्या .आजपर्यंत केवळ ३० टक्के च पिक कर्ज वाटप झाले असून ३० जूनपर्यंत शंभर टक्के पिक कर्ज वाटप करा असे निर्देश आज शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले तहसील कार्यालयात आयोजित पिक कर्ज आढावा बैठकीत आमदार संजय रायमुलकर बोलत होते. यावेळी तहसीलदार डॉ संजय गरकल,सहाय्यक निबंधक गजानन फाटे,उपनगराध्यक्ष जयचंद बाठीया, जि प सदस्य संतोष चनखोरे व बँक अधिकारी हजर होते. यावेळी आ.रायमुलकर यांनी १० जून पर्यंत वाटप पिक कर्ज आढावा घेतला .तसेच ते पूढे बोलले की शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळण्यासाठी कुठलीच अडचण येऊ देऊ नका.


 त्यांचेशी आपुलकीने बोला,योग्य मार्गदर्शन करा. कर्ज माफीचा विषय घेत आ.रायमुलकर म्हणाले की काही बँका कर्ज वाटप करताना फरक रक्कम भरून घेत आहेत.२ लाख रू पर्यतची कर्ज माफी झाली असून यातील ८५ टक्के रक्कम शासन व १५ टक्के रक्कम बँका भरणार आहेत. तेव्हा अशी प्रकरणे तात्काळ निकाली काढा.भाऊ वेगळे व ७/१२ स्वतंत्र् असेल तर दोघांना कर्ज द्या,दलाला मार्फत कर्ज प्रकरणे होत असल्याच्या तक्रारी असून हे दलाल बंद करा व त्यांचे वर गुन्हे दाखल करा.३० जूनपर्यंत शंभर टक्के पिककर्ज वाटप करा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. तर यावेळी बँक अधिकाऱ्यांनी लिंक फेल होत असल्याने अडचणी येतात अशा समस्या मांडल्या. याबाबतीत संबंधित विभागाशी बोलतो असे आ.रायमुलकर म्हणाले.