हिवरखेड प्रतिनिधी @जितेश कारीया
नुकत्याच जाहीर झालेल्या जवाहर नवोदय परीक्षेच्या निकालात सहदेवराव भोपळे विद्यालय येथील तीन विद्यार्थ्यांची निवड झाल्याने विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीत भर पडली आहे. यात वर्ग पाचवीतील गौरी उल्हास राऊत, आचल नरेश कुऱ्हाडे, सुमित प्रल्हाद राऊत यांचा समावेश आहे. या विद्यालयातील तेल्हारा तालुक्यातून दरवर्षी नवोदय साठी विद्यार्थीची निवड होत असते .या निवडीमुळे या विद्यार्थ्यांनी
निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. हे विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद जानोतकर, पर्यवेक्षक राजेंद्र तायडे, वर्ग शिक्षक स्वप्नील गिऱ्हे व सर्व मार्गदर्शक शिक्षक, त्यांचे आई वडील यांना देतात. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक दादासाहेब भोपळे, संस्थाध्यक्ष अनिलकुमार भोपळे व संस्थेचे समस्त पदाधिकारी यांनी कौतुक केले आहे.
