Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

तेल्हारा तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने "मर्दानी महाराष्ट्राची" अभियान संपन्न

Responsive Ad Here
 नरेंद्र इंगळे @प्रतिनिधी बाळापूर ता.

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राज्यात कोरोना महामारीच्या संकटात ज्यांनी जनतेसाठी कोरोना योद्धा म्हणुन महत्वाची भूमिका बजावली अशा महिलांसाठी "मर्दानी महाराष्ट्राची" हा उपक्रम तेल्हारा तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तेल्हारा शहर अध्यक्षा सौ.श्रद्धाताई गढे यांच्यातर्फे राबविण्यात आला. यामध्ये महिला डॉक्टर, नर्स, महिला पोलीस कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशावर्कर अशा महिलांना तेल्हारा तालुक्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना 


राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेश सरचिटणीस सौ. छायाताई कात्रे,  राष्ट्रवादी महिला काँग्रेस अकोला(ग्रामीण) जिल्हा अध्यक्षा सौ. उज्वलाताई राऊत, जिल्हा महासचिव सौ.मनिषाताई देशमुख जिल्हा उपाध्यक्षा सौ. वृंदाताई मंगळे, जिल्हा सचिव मंगलाताई दिंडोकार, आशाताई ढोले, बाळापूर ता.अध्यक्षा सौ.सुनिताताई ताथोड यांचे हस्ते सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तेल्हारा तालुका अध्यक्ष श्री. प्रदिप दादा ढोले, शहर अध्यक्ष श्री. सलिम भय्या, मोनाताई गढे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला 

व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तेल्हारा तालुक्यातील कोरोना योद्धा सौ.जयश्रीताई निलेश देशमुख(आशा सेविका), सौ.मिनाताई मानिक गांगर्डे(अंगणवाडी सेविका), सौ.वनमालाताई जयश्रीराम घाटोळ(आरोग्य सेविका), सौ.प्रतिभाताई सतिश वाकोडे(डॉक्टर), सौ.अनिताताई जांभळे( पोलीस कॉन्स्टेबल), सौ.सविताताई गजानन देशमुख(शिक्षिका),भुलाबाई भिमराव पाटील(अंगणवाडी मदतनीस) यांना सन्मानित करण्यात आले. सौ. सुषमा जयकिरण कावरे       जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, अकोला