Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कोरोना रोगाच्या च्या पार्स्वभुमिवर आदिवासी बांधवांसाठी समाजक्रांती परिवाराचे गजानन पाटोळे सहाय्यक गटविकास अधिकारी ठरत आहेत देवदुत

Responsive Ad Here
नयन खरात @प्रतिनिधी मेहकर

आज ग्राम वागदेव ता.मेहकर येथील आदिवासी गावाला भेट दिली.असता कोरोनाच्या वाढत्या संसर्गापासून ग्रामीण भाग सुरक्षित राहावा,कोरोनाच गांभीर्य गावकऱ्यांना कळावं, त्यादृष्टीने प्रतिबंध कसा करावा..?यासाठी गावकऱ्यांना  मार्गदर्शन केले.
       आदिवासी बांधव सापुतारा,लवासा परिसरातील असो वाआपल्या. त्यांची जीवनशैली बहुदा सारखीच.लवासा परिसर पुणे सारख्या प्रगत जिल्ह्यामध्ये तर सापुतारा गुजरात राज्यामध्ये. पण तेथेही परिस्थिती अशीच.  कसलाही मोठा उद्योग व्यवसाय त्यांच्याकडे नाही.रांनमाळाच्या शेतीवर त्यांचा घरसंसार.काहींची घरं कुडा मातीची तर काही ठिकाणी कौलारूची आहेत.अश्या दुर्लक्षित गावाचा आढावा त्यांनी घेतला


            भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम हे होमिओपॅथी औषध सुचविले आहे.त्यादृष्टीने वागदेव येथील प्रत्येक आदिवासीं बांधवांना ही औषधी डॉ. अग्रवाल  लोणार यांच्या मार्गदर्शनाखाली, समाजक्रांती परिवाराच्या वतीने, मोफत वाटप करण्यात आली. सोबत गावामध्ये 300 मास्क आणि 400 साबण वाटप करून, समाजक्रांती परिवाराने समाजऋण फेडण्याचा प्रयत्न केला.
        रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सकाळी योग,प्राणायाम आणि व्यायाम या सारख्या सवयी लावून,वाढलेलं व्यसनाधीनंतेच प्रमाण कमी  करण्यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न करायला हवेत.प्राधान्याने आपलं घर,आपलं गाव व्यसनमुक्त असणे, हीच खरी प्रगतीची सुरुवात असणार आहे.अशी सूचना या प्रसंगी विशेषतः तरुणांना केली. अश्या पद्धतीने आज अर्धा दिवस आपल्या परिसरातील आदिवासी बांधवांच्या सहवासात राहून, समाजकार्य करण्याच समाधान लाभलं.

         याभेटी मध्ये विशेष सहकार्य होमिओपॅथी डॉक्टर श्री अग्रवाल साहेब लोणार, गजानान पाटोळे सहाय्यक गटविकास अधिकारी मेहकर ,चंदन दरोगा,रामदास  डव्हळे मातरखेड समाजक्रांती परिवाराचे सदस्य  अरुण दळवी दादुल गव्हाण , गजानन  चणेवार सरपंच घाटबोरी,गजानन धामणकर घाटबोरी,सुरेश राठोड घाटबोरी आदी सदस्य व मोतीराम रहाटे साहेब ग्रामसेवक, अर्जुन लठाड सरपंच,श्रीमती वंदना लठाड,श्रीमती वंदना जामकर श्रीमती मंजुळा लठाड अंगणवाडी आणि आशाताई सह,उल्हास लठाड ग्रा प कर्मचारी,  बाळू लठाड रोजगार सेवक ,श्रीमती वाडेकर ऑपरेटर यासह गावकरी उपस्थित होते.यानंतर उर्वरित औषधी व साहित्याचे वाटप पारखेड फाटा येथील गरजू कुटूंबांना वाटप केले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा पोलीस पाटील श्री गजानन पाटील दे.सकरशा यांची उपस्थिती होती.