Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पापळ परिसरात ढगफुटी पेरणीसह शेतजमिनी खरडल्या पापळसह सहा गावात प्रचंड नुकसान नुकसानग्रस्त शेतीचेपंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी माजी आमदार जगताप

Responsive Ad Here
नंदकिशोर इंगळे@प्रतिनिधी अमरावती

नांदगावखंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची आशा असतानाच दि.२२जून ला दुपारी ४वाजता आलेल्या मुसळधार पावसाने नांदगाव खंडे तालुक्यातील पापळ,हिवरा, राजना,काजना,सुकळी,कोव्हळा जठेश्र्वर, तिघरा या गावांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले सर्वत्र शेतात पाणीच पाणी दिसत असल्याने तलावाचे स्वरूप आले होते. या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले सोमवारी तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला मात्र पापळ, कोव्हळा सुकळी, राजना, काजना हिवरा,तिघरां येथे ढगफुटी प्रमाणे प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामुळे या गावात सुमारे ७०० हेक्टर पेक्षा अधिक शेतजमिनी वरील पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले. अतिवृष्टीच्या पावसाचे पाणी 


नदीच्या पात्रात न साठवल्याने या पाण्याने अनेक शेताचे बांध फोडत पेरणी केलेल्या पिकासह शेतजमीन खरडून नेली तसेच हे पाणी अनेक गावात शिरले नदी नाले ओसंडून वाहू लागले तसेच गावात व शेतात सर्वत्र तलावाचे स्वरूप निर्माण झाले होते.  याभागातील पेरण्या नुकत्याच आटोपल्याअसुन पेरणी केलेले बियाणे पूर्ण वाहून गेले आहे. शेतातील बांधफुटल्याने, शेती खरडल्या ने ,शेतात गाळ साचल्याने शेतकरी अक्षरशः खचून गेला आहे.  माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी दि.२४ जून ला दौरा करुन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी पापळ, हिवरा, सुकळी ,राजना, काजना, कोव्हळा यागावांना भेटी देवुन नुकसानीचा आढावाघेतला तसेच शेतकऱ्यांचे सात्वंन केले.ढगफुटी मुळे शेतकऱ्यांवर ओढावलेल्या


 संकटाची माहिती  अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशीमती ताई ठाकूर तसेच जिल्हाधिकारी यांना दूरध्वनी द्वारे देऊन सदर नुकसानग्रस्त भागाचा पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत त्वरित जाहीर करण्याची मागणी केली यावेळी किशोर गुलालकरी, विनोद चौधरी, शेख हकीम, गजानन पोच्छी,गजानन बलखंडे, गौतम महाराज, देशमुख श्रीकांत जूननकर, बबनराव बोरकर विलास बोरकर, छोटु मुंदे,विनोद मुंदे, रामभाऊ हेरोडे,प्रभाकर कथलकर,विनोद लवंगे,ललीत तायडे यांचेसह शेतकरी उपस्थित होते.