Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मल्हार गर्जना संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे राज्यपालांना निवेदन

Responsive Ad Here
शिवदास सोनोने @जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
राज्यपाल नियुक्त आमदारामधे मा. श्री रमेश अण्णा इलामे (जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ) बावनबीर तालुका संग्रामपुर जिल्हा बुलढाणा यांना संधी मिळनेबाबत.
महोदय- 
           महामहिम राज्यपाल साहेब आपणास समस्त पदाधिकारी मल्हार गर्जना संघटना महाराष्ट्र राज्य  यांच्या  वतीने विनम्र विनंती की, आपण राज्यपाल नियुक्त आमदारामधे मा रमेश अण्णा इलामे यांना संधि द्यावी.गेल्या अनेक वर्षापासून  आदरणीय रमेश अण्णा इलामे साहेब यांनी बुलढाणा  जिल्ह्यामधे तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर  धनगर समाजासह बहुजन व् भटके विमुक्त यांच्या न्यायासाठी अग्रभागी आहेत . तसेच जो दुर्बल घटक आहे यांना न्याय देण्याचे कार्य सुरु केलेले आहे व् ते अजूनही चालूच आहे. 20 वर्ष जळगाव जामोद विधानसभा मतदार संघातील तीनही तालुक्‍यांमध्ये त्यांनी धनगर समाजात सर्वप्रथम सामूहिक विवाह मुहूर्तमेढ रोवली  आतापर्यंत  सर्व जाती धर्ममध्ये  या मतदारसंघात  दरवर्षी सामूहिक विवाह सोहळे पार पडत आहेत आतापर्यंत हजारो गरीब कुटुंबातील युवक-युवतींचे  कमी खर्चात विवाह लावून त्यांचे संसार उभे राहत आहेत मतदार संघामधे ते ग्रामपंचायत पंचायत समितीमध्ये निवडून आलेले आहेत व् जनतेशी त्यांची नाळ जुळलेली आहे.तसेच धनगर व भटके-विमुक्त समाजाची बांधनी ही त्यांच्या मार्गदर्शनात उभी झालेली आहे.सर्व सामान्य जनतेला न्याय देणार कणखर नेतृव व् आपला माणूस म्हणून रमेश अण्णा इलामे साहेबांची ओळख आहे.व् त्यांच्या पाठीमागे धनगर समाज व भटके-विमुक्त हा खंबीर पने उभा आहे .भविष्यात नक्कीच आपल्या राष्ट्रासाठी भटके विमुक्तांना दीनदुबळ्यांना न्याय देण्यासाठी विविध क्षेत्रातील बुद्धिवान लोकांसाठी व् गरिबांचे नेतृत्वसाठी ही जमेची बाजु आहे .आदरणीय रमेश अण्णा इलामे साहेब यांनी मल्हार गर्जना संघटना निर्माण केल्यामुळे सम्पूर्ण बुलढाणा जिल्हा हा आनंदात आहे . त्यांनी बहुजन समाजातील विविध जातींना  न्याय देण्याकरिता  आंदोलने  मोर्चे  उपोषण  केली आहे  अन्याय व अत्याचार  याविरुद्ध  गरिबांच्या पाठीमागे ते नेहमीच  आधार बनून बळ देत राहतात व् या नंतर सुद्धा ते गोरगरिबांना करिता काम प्रमाणिक पने करत राहतील यात तीळमात्र शंका नाही . म्हणून समस्त मल्हार गर्जना संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आपणास नम्र विनंती करण्यात येते की आपन त्यांनी संधी देऊन समस्त गोरगरीब बहुजन समाजाचे राजकीय मनोबल वाढऊन त्यांची  राजकीय शक्ति मजबूत करावी.