Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सौ सारीकाताई डागा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपा महिला आघाडीतर्फे गरजूंना व निराधार महिलांना किराणा किटच्या वाटपासह मास्क चे वाटप..

Responsive Ad Here
 वैभव रोकडे  नांदूरा @प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात अजूनही अनलॉकडाऊन 1 सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका गोर-गरीब बांधवांना बसत आहे. त्यामुळेच नांदुरा शहरातील गोर-गरीब, गरजू व निराधार महिलांसाठी मदत म्हणून नांदुरा शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने सौ. सारिकाताई डागा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत किराणा किट वाटप करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमाच्या माध्यमातून सौ. सारिकाताई डागा 


यांच्या वाढदिवसानिमित्त नांदुरा शहरातील वेगवेगळ्या वार्डातील गोर गरीब, गरजू, विधवा तथा निराधार महिलांना घरपोच किराणा किटचे वाटप करण्यात येऊन त्यांना  आधार  देण्यात आला यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून मासक लावून नियमाचे पालन करून हा कार्यक्रम पार पाडला
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या नांदुरा शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने अत्यंत सेवाभावी वृत्तीने सामाजिक बांधिलकी जपून गोर गरीब व निराधार महिलांना मदत करून सौ. सारिकाताई डागा यांचा वाढदिवस साजरा करण्याच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी


सौ. सारिकाताई राजेशकुमार  डागा -शहराध्यक्षा  भाजपा महिला आघाडी.सौ. तुळसाताई अरुणभाऊ पांडव.ज्येष्ठ नेते व उपाध्यक्ष भाजपा महिला आघाडी. सौ.रेणूताई राकेश डागा जिल्हा सोशल मीडिया सदस्य. शुभांगीताई झांबरेभाजपा नगरसेविका. सौ. विद्याताई वाणी स्वयंसेविका समिती नगर कार्यवाहीका. सीमाताई राखोंडे. स्वयंसेविका समिती शारिरीक प्रमुख. सौ.ज्योतीताई सुनिल तांदळे. सौ.सोनलताई मुकेश डागासौ.सिंधुताई राखोंडे सौ.सारिताताई प्रकाश बावस्कार  व इतर सदस्या उपस्थित होत्या.