Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

दै. दिव्यमराठी वृत्तपत्राच्या संपादक व पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल, गुन्हे मागे घेण्यासाठी संग्रामपूर तालुक्यातील पत्रकारांनी पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांना निवेदन देऊन केला निषेध

Responsive Ad Here
 शिवदास सोनवणे@ प्रतिनिधी जिल्हा बुलढाणा

औरंगाबादेत कोरोनानं नुसतं थैमान घातलं आहे. कोरोना रोखायला जिल्हा प्रशासन पूर्णतः असफल ठरलं आहे.आपल्या अपयशाचं खापर जिल्हा प्रशासन आता माध्यमांवर फोडायला लागलं आहे . त्याचाच एक भाग म्हणून माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न औरंगाबाद जिल्हा प्रशासनाकडून होत आहे . याचा संग्रामपुर तालुका पत्रकार बांधवांच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. दीव्य मराठीमध्ये ' 206 नागरिकांचे मारेकरी कोण  नापासांची फौज  निर्णय घेण्यास कोण कुठे चुकले ? अशा मथळ्याखाली दोन बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या . बातम्या चुकीच्या असल्याचं कारण सांगत दीव्य मराठीचे संपादक , प्रकाशक आणि संबंधित वार्ताहराच्या विरोधात प्रशासनाने खोटे गुन्हे दाखल केले आहेत. घडलेल्या घटनेचा संग्रामपूर तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या वतीने या निवेदन द्वारे गुन्हे दाखल करणान्या प्रशासनाचा जाहीर निषेध करीत खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावे.  संबंधित विभागाने देशाचा चौथा आधारस्तंभ माध्यमांना न्यायाच्या दृष्टीने होण्यासाठी वरील घाटाने संदर्भात संबंधित संपादक प्रकाशक वार्ताहर यांच्या वरील खोटे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल . आणि पुढील होणाऱ्या दुष्परिणामास संबंधित प्रशासन



 जबाबदार राहील असे निवेदन संग्रामपूर तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष केशवराव घाटे, दै देशोन्नती चे तालुका प्रतिनिधी काशिनाथ मानकर, दै सकाळ चे तालुका प्रतिनिधी पंजाब ठाकरे, दै. लोकमत चे तालुका प्रतिनिधी अझहर अली, दै. पुण्यनगरी चे तालुका प्रतिनिधी मिर मकसूद अली, दै. महासागर चे तालुका प्रतिनिधी रामेश्वर गायकी, दै. तरुण भारत चे तालुका प्रतिनिधी दयालसिंग चव्हाण, दै. नवराष्ट्र चे विशेष प्रतिनिधी युसूफ शेख, साप्ताहिक बुलडाणा दर्शन चे संपादक सूचित धनभर, लोकमत चे वार्ताहर नारायण सावतकार, गाव माझा न्यूज चे राजेंद्र ससाणे, अब्दुल हमीद शेख, लोकमत चे वार्ताहर श्याम देशमुख, आय बी 7 न्यूज चे गोपाल इंगळे, इरफनोद्दीन काझी, साबीर खान साहेब यांनी तामगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांना देण्यात आले. निवेदनाच्या प्रति गृहराज्यमंत्री मुबंई, जिल्हाधिकारी बुलढाणा, जिल्हा पोलीस अधीक्षक बुलडाणा, तहसीलदार संग्रामपूर यांना पाठवण्यात आल्या आहेत.