शिवदास सोनोने@ जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
जळगांव जामोद - महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दि.18जून2020 रोज गुरुवार ला दुपारी 12.00वा. आगामी गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री, राज्यमंत्री, राज्याचे सचिव ,पोलीस महासंचालक, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे, मूर्तिकार संघटना आणि प्रशासकीय अधिकारी यांचेसह इतर अनेक जनासह व्हिडिओ कानफरसिंगद्वारे आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत बुलढाणा जिल्ह्यातील अंबिका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे वतीने मंडळाचे अध्यक्ष तथा तालुकाप्रमुख गजाननराव वाघ, रमेशभाऊ ताडे संजय जी भुजबळ यांचेसह गणेशोत्सव साजरा करताना सामाजिक बांधिलकी जोपासुन तसेच आज कोरोना चे सावट ह्या गणेशोत्सवावर आहे त्याचा फैलाव होऊ नये ह्याची पूर्णपणे खबरदारी घेऊन सोशल डिस्टसिंग चे पूर्णपणे पालन करत राज्यशासनाच्या आदेशानुसारच तसेच त्यांनी ठरवून देतील त्या निर्देशानुसार हा उत्सव साजरा करण्यात येईल अशी ग्वाही राज्यातील सर्वच गणेशोत्सव मंडळांनी यावेळी दिली त्यानंतर मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे आणि गृहमंत्री ना.अनिल देशमुख यांनी गणेशोत्सव मंडळांना मार्गदर्शन केले.
