शिवदास सोनोने@ जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
ना नफा ना तोटा तत्त्वावर टायझर व एन95 मास्कचे वितरण दिनांक आठ जून दोन हजार वीस ला सातपूडा नगरी जळगाव जामोद मध्ये सन्मान परिवार व स्वर्गीय गोविंद सिंग राजपूत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राजपूत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना या आजारापासून संरक्षण होण्याच्या उद्देशाने जनसेवा म्हणून ना नफा ना तोटा तत्त्वावर हॕण्डसॕनिटायझर व मास्कचे वितरण करण्यात आले. गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना या आजाराने संपूर्ण जगासह भारतात सुद्धा थैमान घातले आहे . सन्मान परिवार विविध फोटोचा , व्हिडिओचा वापर करत सोशल मीडियातून या आजाराविरूध्द लढण्यासाठी समाज जागृती करण्याचे कार्य करीत आहे.
त्यांच्या या सामाजिक कार्याला राजपूत परिवारातील अश्विन राजपूत, अशिष राजपूत या बंधूंनी साथ देत त्यांचे वडील स्वर्गीय गोविंद सिंग राजपूत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सन्मान परिवाराच्या माध्यमातून गरीब जनतेसाठी हॕण्ड सॕनिटायझर ,एन 95 मास्क बाजारभावापेक्षा अर्ध्या किमतीत उपलब्ध करून दिले. या सामाजिक उपक्रमात डाॕक्टर सौ शितल विजयराव बाठे - ठाकरे चेन्नई यांच्या कडून माजी कॅबिनेट मंत्री आमदार डॉक्टर संजय जी कुटे यांच्या हस्ते , नगराध्यक्ष सौ सीमाताई डोबे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेतील गरीब विद्यार्थ्यांसाठी 400 हॕण्डसॕनिटायझर बाॕटल्स गट विकास अधिकारी श्री शिवशंकर भारसाकळे साहेब यांच्याकडे सोपविण्यात आल्या. तसेच N95 मास्क अल्प दरात जामोद येथिल मुळचे हल्ली सुरत येथे आसणारे गौरव राजकुमार भुतडा यांनी उपलब्ध करून दिले.
अभूतपूर्व प्रतिसाद या सामाजिक उपक्रमास सातपुडा नगरी जळगाव जामोद येथिल लोकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला .बाराशे सॕनिटायझर बॉटल्स व एन95 मास्क दोन तासात लोकांनी खरेदी केले. सन्मान परिवार व राजपूत परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम पार पडला . या कार्यक्रमास माजी कॅबिनेट मंत्री डॉक्टर संजय जी कुटे , नगराध्यक्षा सौ सीमाताई डोबे, गटविकास अधिकारी श्री भारसाकळे साहेब, श्रीमती विजया बाई गोविंद सिंग राजपूत, वाल्मीक राव ठाकरे, सन्मान परिवाराचे सर्व सदस्य तसेच राजपूत परिवार उपस्थित होता.


