अभिजित कत्रोजवार शहर प्रतिनिधी गडचिरोली
घोट/गडचिरोली - 23 जून 2020 तक्रादार याना वनक्षेत्राच्या नाल्यातून रेती वाहतूक करताना पकडलेल्या रेतीच्या ट्राकॅरवर कोणतीही कारवाही न करता सोडण्याच्या कामाकरिता वनकर्मचाऱ्यांनी 50 हजार रुपायांची लाच मागणी करून तडजोडीअंती रुपये 20 हजारची मागणी करून लाच रक्कमेचा उर्वरित हप्ता रुपये 10 हजार गै.अ. 3 यांच्याहस्ते स्वीकारल्याने
1) लक्ष्मण गंजीवर वय 57 वर्ष, वनपाल (वर्ग 3) उपक्षेत्र घोट, वन परिक्षेत्र कार्यालय घोट ता. चामोर्शी जि. गडचिरोली
2) नागोजी रावजी सिडाम वय 51 वर्ष, वनरक्षक (वर्ग 3) नियतक्षेत्र घोट, उपक्षेत्र घोट,वनपरिक्षेत्र कार्यालय घोट ता. चामोर्शी जि. गडचिरोली
3) रुपेश वसंत चलाख वय 33 वर्ष, रोजंदारी मजूर (खाजगी इसम) वनपरिक्षेत्र कार्यालय घोट ता. चामोर्शी जि. गडचिरोली
या तिन्ही आरोपीना लाच घेताना लाच लुचपत विभाग गडचिरोली रांगेहात पकडले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे
![]() |
| File photo |
सदरची कारवाही पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर ला. प्र. वी. नागपूर परिक्षेत्र नागपूर , राजेश दुधलवार, अप्पर पोलीस अधीक्षक,परिक्षेत्र नागपूर ,पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनात तपासणी अधिकारी रवी राजूलवार पोलीस निरीक्षक सह सापळा कारवाही पथकाचे पोनी रवी राजूलवर, पोहवा नथ्थू धोटे, पो.ना. कत्तीवार, सुधाकर दांडिकेवर,देवेंद्र लोनबाले, पोशी गणेश वासकर, किशोर ठाकूर, चापोना तुळशीराम नवघरे, सर्व ला. प्र. वी. गडचिरोली यांनी कारवाही केली आहे.
