पवन चव्हाण@ प्रतिनिधी नांदुरा
महाराष्ट्राचे आराध्दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने ६ जून ला सकाळी शिवरायांच्या पुतळ्याचा जलाभिषेक करून विधिवत पूजन करण्यात आले. त्यांनतर रक्तदान शिबिर सुरू झाले. या शिबिरात तरुणांनी व जिजाऊंच्या लेकिंनी भरभरून प्रतिसाद देत ८१ बॉटल रक्त दान केले.
या शिबिरात एम आय एम शहराध्यक्ष गाफुर शेख ,शहर महासचिव आसिम खान तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील रक्तदान केले. शिबिरासाठी मां जिजाऊ सावित्री विचार मंच नांदुरा ने चांगले सहकार्य केले. अशोकराव घनोकार व गजाननजी घनोकार यांनी शिबिराला जागा उपलब्ध करून मदत केली.
यावेळी खामगाव येथील रक्तपेढी मधील सर्व डॉक्टर्स यांनी मोलाचे सहकार्य केले. शिबिरात संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष योगेश पाटील,जिल्हा सचिव शरद पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष मंगेश सोळंके यांनी प्रमुख उपस्थिती लावली. व संभाजी ब्रिगेडच्या तालुका व शहर पदाधिकाऱ्यांनी तसेच मा. जिजाऊ सावित्री विचार मंचाने हे शिबिर यशस्वीरीत्या पार पाडले


