शेख सज्जाद शेख करामत@ प्रतिनिधी लोणार
जगभरात अनेकांचे राज्याभिषेक झाले,
पण रयतेसाठी, रयतेच्या स्वराज्यात,
रयतेच्या राजाचा राज्याभिषेक म्हणजे शिवराज्याभिषेक
एकमेवाद्वितीयच असा रयतेचा सोहळा !!
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा..!!
६ जून मेहकर येथे आजच्या दिवसा निमित्त संत सेना महाराज बहुउदेशीय सेवा मंडळ मेहकरच्या वतीने रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उदघाटन मा सौ मानिषाताई पवार अध्यक्षा जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीत मा लक्ष्मणराव घुमरे माजी जिल्हाध्यक्ष, मा श्यामभाऊ उमाळकर प्रदेश
सरचिटणीस, मा भास्करराव ठाकरे माजी अध्यक्ष, मा देवानंद पवार तालुकाध्यक्ष, मा जयचंद भाटिया उपाध्यक्ष नगरपालिका, मा विष्णुभाऊ सरदार मा प्रा परमानंद गारोळे मा प्रा विश्वनाथ बाहेकर मा भाऊ छबिले मा विलासराव तेजनकर तालुकाध्यक्ष मराठा सेवासंघ इ होते
यावेळी मा प्रा विनोद प-हाड मा ऍड राजेश रेखे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी रक्तदान केले आहे. या संस्थेचे अध्यक्ष मा महादेवराव ससाणे मा ज्ञानेश्वर झगरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेऊन या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले आहे.


