Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

स्कुल ऑफ स्मार्ट किड्स ने नाकारला दोन विद्यार्थ्यांना प्रवेश पहिलीच्या प्रवेशासाठी दोन भावंडांचा संघर्ष शिक्षण अधिकाऱ्यांनाही दिले निवेदन

Responsive Ad Here
अमरावती प्रतिनिधी नंदकिशोर इंगळे

    केवळ संचालकांना नकोय म्हणून चक्क शाळेच्या मुख्याद्यापकांनी दोन चिमुकल्या भावंडांचा पहिलीचा प्रवेश नाकारल्याचा प्रताप गुरुकुल शिक्षण संस्था नांदगांव खंडेश्वर येथील स्कुल ऑफ स्मार्ट किड्स या शाळेने केला आहे. केजी १ व केजी २ चे शिक्षण दोन्ही भावंडांनी याच शाळेत पूर्ण केले आहे मात्र पहिलीच्या प्रवेशासाठी ज्यावेळी पालक या शाळेत गेले तेव्हा संचालक मंडळाने नाही म्हटले त्यामुळे तुमच्या पाल्यांना शाळेत प्रवेश देता येत येणार नाही म्हणून शाळेतून हाकलून लावल्याचा धक्कादायक प्रकार नांदगांव खंडेश्वर येथील स्कुल ऑफ स्मार्ट किड्स शाळेत उघडकीस आला आहे. याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकाने शिक्षण अधिकारी यांना लेखी तक्रार सादर केली असून दोन्ही भावंडांचा मात्र शिक्षणासाठी संघर्ष सुरू आहे. शिव व राज पंकज मानतकर असे प्रवेश नाकारलेल्या दोन्ही भावंडांची नावे आहेत. तर आई श्वेता व वडील पंकज मानतकर यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून १ जून रोजी शिव आणि राज या दोन्ही भावंडांचा पहिलीमध्ये प्रवेश निश्चित करण्याकरीता ते स्कुल ऑफ स्मार्ट किड्स मध्ये गेले असता ईतर विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू


 होती. मात्र जेव्हा शिव आणि राज या विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रक्रियेसाठी नंबर आला असता शाळेचे मुख्याध्यापक यांनी तुमच्या दोन्ही पाल्यांचा प्रवेश घेता येणार नाही असे स्पष्ट करीत संस्थेचे सचिव राम महाजन यांना तुमचा विरोध असून आपण बाहेर कोणत्याही शाळेत प्रवेश निश्चित करावा असे सांगितले.पालकांनी संचालक मंडळाचे पदाधिकारी मनोज मानतकर यांचेशी संपर्क केला असता त्यांनी ईतर संचालकांना जाब विचारला तर त्यांनी मानतकर यांनाही उडवाउडवीची उत्तरे दिली.पालकांनी सर्व पदाधिकाऱ्यांना भेटून प्रवेश करण्यासंबंधी याचना केली मात्र कोणीही त्यांची दखल न घेतल्याने शिव राज सह पालक निराश होऊन आपल्या घरी पोहचले.आपल्यावर अन्याय झाल्याची बाब त्यांना खटकल्याने पंकज मानतकर यांनी शिक्षणाधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रार सादर केली असून स्कुल ऑफ स्मार्ट किडस मध्ये माझ्या मुलांचा प्रवेश झाला नाही तर आपण कायदेशीर मार्ग अवलंबू होणाऱ्या नुकसानास स्वतः शाळा व्यवस्थापन जबाबदार असेल असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
 राम महाजन विरोधात संताप
 राम महाजन हे मागील पंधरा वर्षांपासून पंचायत समिती नांदगांव खंडेश्वर अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.असे असतांना देखील ते गुरुकुल शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून कारभार पाहत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा प्रवेश स्कुल ऑफ स्मार्ट किडस मध्ये करण्यास त्यांची मोठी भूमिका आहे. त्यांनी हेतुपुरस्सर या दोन्ही विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारल्याने पालकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.