रवी मारोतकर@ प्रतिनिधी नांदगाव खंडेश्वर
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ७०% च्या वर शेतकऱ्याने पेरणी केली असून त्यातील ६०% शेतकऱ्यांच्या शेतातील परलेले महाबीज कंपणीसह विविध कंपणीचे बियाणे उगवलेच नाही त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे . एवढे महाग बियाणे पेरुण सुध्दा बियाणे निघाले नाही त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे म्हणून या शेतकऱ्यांना पेरणीच्या खर्चासह मोफत बियाणे तातडीने द्यावे अशी मागणी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश मारोटकर यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांना मागणीचे निवेदण सादर केले आहे .नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कृषीकेंद्र धारकांनी बियाणे विक्री करीता विविध कंपणीचे सर्वाधिक बियाणे यवतमाळ जिल्ह्यातून आणली आहे . बियाणे पूर्णपणे बोगस असतांना सदर्ह बियाण्यावर जास्त नफा मिळत असल्यामुळे याच बियाण्याची विक्री जास्त करण्यास शक्कल लढविली . विशेष बाब विदर्भात कुठेच एवढी महाग बियाणे विकल्या गेली नसेल .
एवढ्या जादा दराने तालुक्यातील दुकानदारांनी बियाण्याची विक्री केली आहे . कृषी विभागाने मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे . पेरणी केलेल्या विविध कंपणीचे बियाण्याचे अर्धेच पैसे संबंधित दुकानदार देत आहे मात्र पेरणीच्या खर्चाचे काय ? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे . महाबीज बियाण्याची जास्त तक्रारी असतांना त्याची भरपाई मात्र कुणीच देण्यास तयार नाही. हजारो तक्रारी कृषी विभागाकडे शेतकऱ्यांने केल्या आहे मात्र अजूनही शेतकऱ्याच्या बांधावर सर्वे करण्यास कृषी विभाग पोहोचला नाही . यात दुबार पेरणीची वेळ निघुन जात आहे . शेतकरी चिंतेन पडला आहे . त्यामुळे तातडीने शेतकऱ्यांना मोफन बियाणे उपलब्ध करून दयावे व पेरणीचा खर्च देण्यात यावा अशी मागणीसुध्दा युवा सेनेचे प्रकाश मारोटकर यांनी कली आहे . तसेच विविध कंपण्या , बियाणे पास करणारे संबंधित अधिकारी यांचेवर तातडीने गुन्हे दाखल करावे अशी सुध्दा मागणी करण्यात आली आहे . या मागणीचे निवेदण मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचेसह कृषी मंत्री दादा भुसे , विभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.

