गणेश पांढरे @ जळगाव प्रतिनिधी.
- पाचोरा-भडगाव तालुका कोरोनामुक्तीची वाटचाल आनंदाची बाब आहे. याचे सर्व श्रेय प्रशासनाला जाते. सरकारने लॉकडाऊन शिथिल केला म्हणजे कोरोना संपला असे नाही. लोकांनी कोरोनाला विसरू नये. सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळावे ,मास्क वापरवा. कोरोना सोबत जगण्याची सवय करावी असे आवाहन केले. पाचोरा भडगावरोड वरील पोतदार आयटीआय च्या जागेत सर्व सोयी सुविधांनी सज्ज १०० बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. सत्ताधारी खासदार उन्मेष पाटील यांनी शेतकऱयांच्या विषयांवर निवेदनात आजी-माजी आमदारांवर आरोप करणे तथ्यहीन आहे. खासदारांनी मतदार संघात दिशाभुल करणारे राजकारण करू नये. आ.किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत खासदारांचा शेतकऱयांच्या विविध प्रश्नांवर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गणेश पाटील, स्विय सहाय्यक राजेश पाटील, उपस्थित होते. गेल्या तीन-चार महिन्यांपासून मतदार संघ कोरोनामुक्त करण्यासाठी काम करीत आहे.
पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱयांच्या समस्यांचेसह्याचे निवेदन देतांना आजी-माजी आमदारांवर आरोप करणे खासदारांचे अपयश आहे. केंद्रात सत्ता भाजपाची, खासदार- भाजपाचे ,दूध संघात चेअरमन व बाजार समितीत सभापती भाजपा सत्तेत आहे. हे असतांना खासदारांनी निवेदन देणे हास्यास्पद आहे. खासदारांनी कबूल केले आहे की, औरंगाबादचे विभागीय कापूस महासंघ माझे ऐकत नाही. मतदार संघातील वीस हजार समस्यांग्रस्त शेतकऱयांच्या सह्या घेऊन विविध समस्यां सोडविण्याचा दावा खासदार करतात. माहिती नुसार पाचोरा तालुक्यात कापूस खरेदी सात ते साडे सात हजार शेतकऱयांनी नोंदणी केली आहे.पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत पाच ते सहा हजार कापूस नोंदणी संशयास्पद आहे. मग वीस हजार शेतकरी कसे काय. शेतकऱयांना न्याय द्यायचा असेल तर त्यांनी केंद्राच्या पीक विमा कंपनीला जाब विचारावा.
दूध संघात भाजपा चेअरमन यांना निवेदन द्यावे. मुद्रालोन पासून वंचित बेरोजगारांना न्याय द्यावा खासदार दोन तालुक्या पुरते नाही. त्यांनी सर्व शेतकऱयांचे प्रश्न सोडवावे. दिशाभूल करू नये अन्यथा कपडे उतरवू असा इशारा आ.किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

