अभिजित कत्रोजवार @ गडचिरोली शहर प्रतिनिधी
भामरागड :- 21 जून हा दिवस आंतराष्ट्रीय योग दिन मानून साजरा केला जातो. त्या निमित्याने या दुर्गम भागात अनेक गुण संपन्न असणारे अनेक लोक आहे. त्यातले 1 श्री राजू भाऊ कोठारे हे अनेक वर्षापासून आदिवासी भागात योगाचे शिक्षण देत आहेत व योगाचे फायदे सुद्धा समजावून सांगतात.
तसेच राजे विश्वेश्वराव कला महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात नेहमी आदिवासी विध्यार्थ्यांना योगाचे शिक्षण व त्याचे महत्व समजावून देतात. अति दुर्गम भागात सर्वाना योगाचे शिक्षण लाभावे म्हणून योगाचे मोफत शिक्षण देतात. या त्यांच्या कार्याबद्दल सम्पूर्ण भागा मध्ये कौतुक केल्या जात आहे.

