प्रतिनिधी पातुर @मुकेश हातोले
मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आंबेडकरी समूहावर जातीय मानसिकतेतून कोरोणा सारख्या रोगराईच्या लॉकडाऊन च्या काळात रोज हल्ले होत आहेत. ते खालील प्रमाणे झाले.
१) नागपूर येथील उच्चशिक्षित सामाजिक, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अरविंद बनसोड (३२) (रा. पिंपळधरा, तालुका. नरखेड) या होतकरु युवकाचा मृत्यू संशयास्पद मृत्यू झाला गॅस आफीसच्या बॅनवरील फोन नंबर चा फोटो काढला म्हणून गॅस आफीसचा संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस चा पदाधिकारी मिथिलेश उमरकर ने जबर मारहाण केली व त्याला आत्महत्येच स्वरुप देण्याचा प्रयत्न केला.
२) पिंपळे सौदागर येथील विराज जगताप या २० वर्षीय तरुणीची उच्चवर्णीय मुलीशी प्रेम केलं म्हणून तीच्या नातेवाईकांनी सशस्त्र हल्ला करून विराज जगताप हत्या करण्यात आली.
३) साळापुरी तालुका परभणी येथील रात्रीचा बौद्ध तरुणांवरील जीवघेणा हल्ला. वर्षभरापूर्वी निळा झेंडा लावला म्हणून वाद सुरू झाला त्याचा राग म्हणून रात्री कट रचून बौद्ध तरुणांना बोलावून अंधारात हल्ला केला, बौद्ध तरुणांन रक्तबंबाळ होऊन जीव मूठीत घेऊन पळाले.
१) वरिल प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी
२) वरिल प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे.
३) आरोपींवर अॅक्ट्रोसिटी अॅक्ट दाखल करावा.
४) पिडीत कुटुंबांना पोलिस संरक्षण देण्यात यावे.
तसेच आंबेडकरी समुहावरील हल्ले व अत्याचार रोखण्यासाठी ठोस भुमिका घेण्यात यावी. अन्यथा आंबेडकरी समूहाच्या आंदोलनाला शासनाने सामोरे जावे. असा इशारा ग्रामीण युवा संघटना अकोला जिल्हा महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा.सतीश देवराव हातोले यांच्या मार्गदर्शनाखाली,जिल्हा महासचिव मा.नरेद्र नवनित इंगळे, मा.अमोल खंडारे (ता.कार्याध्यक्ष),मा.रंजित तायडे,(ता.अध्यक्ष)यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सरचिटणीस मा.आकाश सावळे, मा.राष्ट्पाल भोजने(ता.सचिव) यांनी पोलिस स्टेशन व बाळापुर येथे श्री.शिंदे साहेब ठाणेदार यांना निवेदना द्वारे दिला
