Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आमदार रवी राणा यांचा बोगस बियाणे उत्पादक कंपनी व अधिकाऱ्यांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Responsive Ad Here
राजू कलाने @प्रतिनिधी अमरावती 

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आमदार रवी राणा यांचा दणका,थेट कृषिमंत्र्यांशी  भ्रमणध्वनी द्वारे चर्चा,बोगस बियाणे उत्पादक कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना आदेश,शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्यासोबत प्रति एकर 7000 रुपये नुकसान भरपाई  द्या,शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या व नफाखोरी काळाबाजार करणाऱ्या बियाणे उत्पादक  कंपन्यांना कदापिही माफ करणार नाही आमदार रवी राणा यांचा आक्रमक पवित्रा,,अधिकाऱ्यांना स्वतः पोलीस स्टेशनमध्ये मध्ये घेऊन जाऊन गुन्हे दाखल करणार-आमदार रवी राणा ,,शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका अन्यथा गाठ माझ्याशी आहे,कोणालाच माफ करणार नाही आमदार रवी राणा यांचा बोगस बियाणे उत्पादक कंपनी व अधिकाऱ्यांना इशारा अमरावती-अमरावती जिल्ह्यासह विदर्भात शेतकऱ्यांनी खरीप च्या पेरण्या केल्या परंतु 



अनेक दिवस उलटूनही बियाणे उगवलेच नाही, बियाण्याची उगवण क्षमताच नव्हती,मोड आली शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले,खरीपाचा हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची पाळी आली.शासनाने आदेश काढले पण ते कागदावरच राहिले अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त होऊनही तालुका कृषी अधिकारी,कृषी सहायक यांनी प्रत्यक्ष शेत बांधावर जाऊन पाहणी न करता थातूर मातूर चौकश्या करून शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले. या सर्व बाबीची दखल घेऊन आमदार रवी राणा यांनी आज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात तातडीची बैठक घेतली व खरीप हंगाम पूर्वतयारी, पेरणी ,बियाणे पुरवठा आदी बाबींचा आढावा घेतला.या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री विजय चवाळे, कृषी उपसंचालक अनिल खर्चान,तालुका कृषी अधिकारी आर.जी.पाडवी, तालुका कृषी अधिकारी कु.एम टी कोकाटे,उपविभागीय कृषी अधिकारी कु मुकाडे,श्री के.एम.हतगळे आदी उपस्थित होते.या बैठकीत आमदार रवी राणा यांनी संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला. तालुकानिहाय किती शेतकऱ्यांच्या बोगस बियाण्याबाबत तक्रारी आल्या आहेत या संदर्भात काय कारवाई झाली याचा आढावा घेतला. उत्सव कंपनी,ग्रीन गोल्ड,कोहिनूर, रिगर,वरदान,अंकुर,  महाबीज, रोहित ऍग्रो ,विनायक आदी बियाणे उत्पादक कंपन्यांचे बियाणे बोगस निघाले असून त्या संदर्भांत बियाणे कंपन्या वारंवार समज व दम देवुनही दुर्लक्ष करीत असल्यामुळे ,कृषी अधीकारी व बियाणे उत्पादक कंपन्यांचे साटेलोटे व मिलीभगत असल्याचे आरोप करून आमदार रवी राणा यांनी थेट कृषी 


मंत्री दादाजी भुसे  यांना चालू बैठकीत  मोबाईल वर फोन लावला व जिल्ह्यातील परिस्थिती विशद केली व शेतकऱ्यांना तात्काळ न्याय देण्याची मागणी केली,कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी तात्काळ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री विजय चवाळे यांना संपर्क करून दोषी कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.या नुसार या  बैठकीत असे ठरविण्यात आले की 2 दिवसाचे आत जर सदर कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून बियाणे व प्रति एकरी 7 हजार रुपये नुकसान भरपाई न दिल्यास सर्व कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे ठरले.आमदार रवी राणा यांनी सदर बैठकीत उपस्थित सर्व अधिकाऱ्यांकडून तसे लेखी निवेदन लिहून घेतले व 2 दिवसाची मुदत ही अंतिम असून या  कालावधीत जर  कंपन्यांनी शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर 3 जुलै रोजी आपण सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाऊन या कंपन्यांवर गुन्हे दाखल करु व जे अधिकारी-कर्मचारी  सहकार्य करणार नाही त्यांची या वर्षीच्या 1जुलै ची वेतनवाढ रोखली जाईल अशी तंबी दिली.आपण शेतकरी शेतमजुरांच्या हितासाठी कुठल्याही स्तराला जाऊ शकतो व शेतकऱ्यांच्या हितासाठी कुणालाही माफ करणार नाही,शेतीला वाचवा व शेतकरी वाचवा हेच आपले ध्येय असल्याचे आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केले.या बैठकीला जिप सदस्य मयुरिताई कावरे,दिनेश टेकाम, भातकुली नप उपाध्यक्ष गिरीष कासट ,युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाने,विनोद जायलवाल,आशिष कावरे,हर्षल रेवणे, मंगेश इंगोले,अजय मोरया,उमेश ढोणे, पवन हिंगणे,देवानंद राठोड,अजय घुले, नितीन बोरेकर, विनोद गुहे,पराग चिमोटे,अजय बोबडे,राहुल काळे,विजय चव्हाण, शुभम उंबरकर,ललित पिवाल, सौरभ माहोरे,निलेश भेंडे,गणेश मारोडकर आदी उपस्थीत होते.