शेख सज्जाद शेख करामत लोणार तालुका प्रतिनिधी
आज दिनांक १९/०६/२०२० रोजी सायंकाळी 10,00 वाजता M T D C लोणार येथे खासदार राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त लोणार शहर व तालुका काँग्रेस च्या वतीने रक्तदान शिबिराचा आयोजन करण्यात आले होते, औरंगाबाद येथून हेडगेवार रक्त पेढ़ी यांची पूर्ण टीम आली होती,आणि लोणार ला रक्तदान शिबिराचा कार्यक्रम पार पडला,झालेल्या कार्यक्रमाचे उदघाटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस श्याम भाऊ उमाळकर, यांनी केले. तसेस ऍड अनंतराव वानखेड़े मेहकर विधानसभा,लोणार नगराध्यक्षा सौ पुनम ताई पाटोळे,उपाध्यक्ष बादशाह खान,मेहकर शहर अध्यक्ष कलीम खान,प्रा गजानन खरात,माजी नगराध्यक्ष विद्यमान
नगरसेवक गट नेते भुषन मापारी,सर्व काँग्रेस चे नगरसेवक,तौफीक सेठ कुरेशी,गुलाब सरदार, आबेद खान,अब्दुल रऊफ ,रमज़न गवळी,संतोष मापारी, सतिष राठोड तसेच माजी नगरसेवक चाटे, साहेबराव पाटोळे,नितिन शिंदे शहर अध्यक्ष लोणार,,तालुका अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य श्री राजेश मापारी,यांच्या उपस्थितित कायकर्म पार पडला,या मध्ये सत्कारात पुष्प गुच्छ देऊन पाहोण्याचे स्वागत केले,सौ पुनम पाटोळे नगराध्यक्षा लोणार यांचाआज वाढदिव असल्या मुळे श्याम भाऊ उमाळकर यांनी त्यांना शाल व पुष्पगुच्छ
देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, कार्यक्रमात शाहीदांना श्रद्धांजलि,देण्यात आली असून रक्तदान करणाऱ्यांना प्रमानपत्राचे वाटप,करण्यात आले व श्याम भाऊ उमाळकर यांनी आपल्या भाषणातून राहुलजी गाधी यांना शुभेच्छा दिल्या व राष्ट्रीय कार्यक्रमात तालुका काँग्रेस,शहर काँग्रेस,व युवक काँग्रेस सर्व पत्रकार यांनी चांगला सहभाग घेतला व रक्तदान करुण घेतले,त्या बद्दल आभार व्यक्त केले, कार्यक्रम चे आभार प्रदर्शन शहर अध्यक्ष नितिन शिंदे यांनी केले.


