जळगाव प्रतिनिधी@ गणेश पांढरे
जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात उपलब्ध आयुर्वेद,होमीयोपॅथी, व अॅलोपॅथीच्या त्रीवेणी संगमातून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचबरोबर फिजीओथेरेपीस्ट तज्ञांनी देखिल रूग्ण बरे करण्याचा ध्यास समोर ठेवला आहे. कोविड रूग्णांसाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देतांना आयुर्वेद, होमीयोपॅथी, तसेच अॅलोपॅथीचे तज्ञ विचार विनीमय करून उपचाराची दिशा ठरवत आहे. याचबरोबर श्वसनाचे व्यायाम,योगा,नुट्रीशियन फुडस, सेंट्रलाईज्ड ऑक्सीजन व्यवस्था,तज्ञ डॉक्टरांच्या अविरत सेवेमूळे कोरोना मुक्त होणा—या रूग्णांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे.
