Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 107 वृक्षारोपण करण्याचा संकल्प

Responsive Ad Here
वैभव रोकडे प्रतिनिधी नांदुरा ग्रमिन

आंतरराष्ट्रीय जि प शाळा बोराखेडी येथे वसंतराव नाईक  १०७ वी जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त १०७ झाडांच्या वृक्षारोपण करण्याचा संकल्प जि प शाळा बोराखेडी येथे सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली. नुकताच बोराखेडी शाळेला १२ गुंठ्ठे जागा दान मिळाली आहे सदर जागेत नाईक साहेब यांच्या१०७ व्या जयंतीनिमित्त १०७ झाडांची लागवड करण्याचा संकल्प मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी केला आहे हेच खरे जयंतीला अभिवादन ठरणार आहे. वसंतराव नाईक यांनी शेतकरी सुखसंपन्न व्हावा यासाठी


 खुप प्रयत्न केले. वेगवेगळे संकरित धान्याच्या जाती निर्माण करून जास्तीत जास्त उत्पादन देणारे बियाणे निर्माण केले जेणेकरून शेतकरी सुखसंपन्न झाला पाहिजे हे त्यांचे स्वप्न होते. कृषीविषयक अनेक जनहितार्थ ध्येयधोरणे राबविली व महाराष्ट्र कृषिप्रधान करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली .त्यांच्या याच विचारावर मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी प्रकाश टाकत १०७ झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. यावेळी शिक्षक महेंद्र तायडे,सौ रजनी बांगर सौ अनुप्रिता व्याळेकर, सौ सुनिता हुडेकर,सौ. वामिंद्रा गजभिये,सौ सिमा गोरे,सौ  श्रीमती सुनिता न्हावकर, संध्या नाईक,नलिनी जाधव,जया चव्हाण, शितल तायडे,दिपाली सोनवणे, अंकिता हिरळकर, सागर गोलाईत उमेश चहाकर उपस्थित होते.