Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

भारतीय डाक विभागाच्या अखिल भारतीय स्तरीय निबंध स्पर्धेत अमरावतीच्या 2 मुली विजयी

Responsive Ad Here
नंदकिशोर इंगळे प्रतिनिधी अमरावती

   भारतीय डाक विभागातर्फे दरवर्षी अखिल भारतीय स्तरावर व राज्यस्तराव निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने, डाक विभागाच्या ‘ढाई आखर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या निबंध स्पर्धेत अमरावतीच्या कु. आर्णा कचवे आणि कु. अशरा बेग यांनी अनुक्रमे अंतरर्देशिय पत्र व लिफाफा गटात व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावून जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे.‘ढाई आखर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या निबंध स्पर्धेकरीता 1 ऑगस्ट 2019 ते 31 जानेवारी 2020 या कालावधीत भारतातील नागरिकांकडून निबंधाची प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. तसेच 18 वर्षापर्यंत व 18 वर्षावरील या दोन गटात निबंध स्पर्धेसाठी प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. वर्ष 2019-2020 या वर्षाकरिता ‘प्रिय बापू, आप अमर है’ हा निबंधाचा विषय होता. या निबंध स्पर्धेकरीता जिल्ह्यातुन 3 हजार पेक्षा अधिक प्रवेशिका अमरावती डाक विभागाव्दारे मुख्य पोस्ट मास्तर जनरल मुंबई 01 यांच्या कार्यालयात पाठविण्यात आल्या होत्या.  
             अखिल भारतीय स्तरावरील निबंध स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात जिल्ह्यातील दोन शाळकरी विद्यार्थिनींनी दहा हजार रुपयांचे व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. मनीबाई गुजराती हायस्कूलची इयत्ता आठवीची विद्यार्थीनी कु. आर्णा प्रफुल कचवे हिने अंतर्देशीय पत्र गटात तर होली क्रॉस हायस्कूलच्या इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु. अशरा बेग हिने लिफाफा गटात पारितोषिक पटकाविले आहे. शाळकरी विद्यार्थिनींच्या या यशामुळे जिल्ह्याचे नाव रोशन झाले आहे.अमरावती विभागाचे प्रवर डाकघर अधिक्षक यसला नरेश यांनी विजयी विद्यार्थिनींचे कौतूक करुन अभिनंदन केले आहे. यावर्षी सुध्दा भारतीय डाकघर विभागाच्या ‘ढाई आखर’ या निबंध स्पर्धेत जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थी, नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.