प्रतिनिधी @पवन चव्हाण
3 वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला तत्काळ फाशी द्या - मराठा क्रांती मोर्चा नांदुरा 24 जुलै रोजी दुपारी नांदुरा येथे एक निंदनीय प्रकार घडला. नैनेश लक्ष्मणदास रामचंदानी या नराधमाने नांदुरा येथील 3 वर्षीय बालिकेला उचलून नेऊन पंचायत समितीच्या मागील झाडा झुडपात तिच्यावर बलात्कार करून तिला जिवंत मारण्याचा प्रयत्न केला. परंतु पंचायत समिती येथील काही कर्मचारी यांना मुलीचा रडण्याचा आवाज आल्यामुळे त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना 3 वर्षीय बालिका दिसली. व तिच्या गळ्याला फाशी देण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. व तत्काळ वेळ न घालवता मुलीला योग्य उपचारासाठी मुलीला रुग्णालयात हलविण्यात यामुळे तिचे प्राण वाचले. 3 वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमास तत्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा नांदुरा च्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे लोक बहुसंख्येने उपस्थित होते.

