Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

औरंगाबाद करोनाचे बाधित रुग्ण संख्या 6000च्या घरात नागरिक चिंताग्रस्त

Responsive Ad Here
दत्ता जाधव @ प्रतिनिधी औरंगाबाद 3जुलै 

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या सहा हजारांच्या घरात पोहचली आहे. सलग द्विशतकी वाढ सुरुच असुन आतापर्यंत सर्वात उच्चांकी तपासणीची नोंदही झाली आहे. बुधवारी करण्यात आलेल्या १२०० स्वॅबच्या संकलनातून २०६ रुग्णांना कोरोनाचे निदान झाले आहे. यात महापालिका हद्दीत १७१ तर ग्रामीण भागात ३५ रुग्ण आढळून आले. गुरुवारी सकाळी २०६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली.  त्यामध्ये १२२ पुरुष तर ८३ महिला व अन्य एकाचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ५९८८ कोरोनाबाधित आढळले असून २८५७ बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर आजपर्यंत २७१ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याने २८६० रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे प्रशासनाने कळवले आहे. मनपा हद्दीत आढळले १७१ रुग्ण सिडको १, गजानन नगर, गारखेडा १, काबरा नगर, गारखेडा १, फुले नगर, उस्मानपुरा १, नारळीबाग २, पुंडलिक नगर ४, सिडको एन-अकरा ३, मिसरवाडी २, शिवाजी नगर ६, सुरेवाडी १, जाधववाडी ५, सातारा परिसर 



३, छावणी ५, द्वारकापुरी, एकनाथ नगर ६, आयोध्या नगर २, नवनाथ नगर १,  रायगड नगर २, उल्कानगरी १, शिवशंकर कॉलनी १०, एन बारा टी व्ही सेंटर ३, पोलिस कॉलनी, पडेगाव ५, बेगमपुरा १, मेडिकल क्वार्टर परिसर १, रवींद्र नगर २, पडेगाव २, बायजीपुरा ३, समता नगर १, मयूर पार्क १, नागेश्वरवाडी १, रोकडिया हनुमान कॉलनी १, कृष्णा नगर, बीड बायपास १, ज्योती नगर १, एन सात सिडको, बजरंग चौक २, हनुमान नगर ७, उस्मानपुरा २, भोईवाडा २, बन्सीलाल नगर १, कुंभारवाडा २, रमा नगर १, शांतीनिकेतन कॉलनी १, भाग्य नगर १०, सौजन्य नगर १, कांचनवाडी १३, नाथ नगर ३, राहुल नगर ६, देवळाई परिसर १, हायकोर्ट परिसर १, राम नगर १, नवजीवन कॉलनी १, अल्तमश कॉलनी १, ठाकरे नगर ३, एन दोन सिडको १, एन सहा सिडको २, सावंगी हॉस्पीटल परिसर १, सावंगी, हर्सुल २, न्याय नगर १, एन नऊ सिडको २, विशाल नगर ३, एसटी कॉलनी ६, सेव्हन हिल १, गांधी नगर १, गुरु सहानी नगर १, टीव्ही सेंटर १, सदाशिव नगर १, एकनाथ नगर १, खोकडपुरा १, मुकुंदवाडी १, द्वारकानगरी, एन अकरा १, एन बारा, हडको २, नूतन कॉलनी १, अन्य १ रुग्ण शहर परिसरात आढळून आले.