Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पातूर शहरामध्ये 7 दिवस जनता कर्फ्यु लागू करा

Responsive Ad Here
मुकेश हातोले प्रतिनिधी पातूर

आज संपूर्ण देशासह महाराष्ट्रामध्ये कोरोना महामारीच्या आजारामुळे थैमान घातले असून सर्वत्र संकटमय परिस्थिती निर्माण झाली आहे.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आजाराचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत असून आपल्या पातूर शहरामध्ये सुद्धा रुग्णाची संख्या वाढत चालली असून ह्यापासून असंख्य नागरिकांचा जीव हा धोक्यात आला आहे. तरी ह्या आजारावर सद्यस्थितीत कुठल्याही प्रकारची प्रतिबंधात्मक ओषधी

 नसल्यामुळे व पातूर शहरामध्ये 40 रुग्णसंख्या वाढली असून ह्या आजाराची साखळी तोडण्यासाठी 7 दिवसाचा जनता कर्फ्यु लागू करण्यात यावा व शहरातील सर्वच नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात यावी अशी मागणी बालुभाऊ बगाडे माजी सभापती पंचायत समिती पातूर,आकाश हिवराळे जिल्हासंघटक रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अकोला,सागर इंगळे अध्यक्ष  ईगल ग्रुप पातूर,सामाजिक कार्यकर्ते गणेश बोचरे,सामाजिक कार्यकर्ते मंगल डोंगरे ,राहुल भगत,सुमेध पोहरे,पूजेश गोळे आदींनी तहसिलदार,ठाणेदार ग्रामविकास अधिकारी,व मुख्याधिकारी नगर परिषद पातूर ह्यांना निवेदनाद्वारे केली.