प्रमोद देशमुख नांदगाव प्रतिनिधी
खामगाव तालुक्यातून भारत भ्रमंतीला निघाली आहे. आता पर्यंत या सुपरआजीने माहूरगड, तसेच वैष्णव देवी पर्यंतचा तब्बल 4000 किलोमीटरचा प्रवासी मागील दोन वर्षात पूर्ण केला असून यावर्षी वैष्णोदेवी च्या पुढे जाऊन अमरनाथची यात्रा सायकल ने पूर्ण करणार आहे. रेखा जोगळेकर अस या आजीच नाव असून समाजात आदर्श घडवत आजीबाईने M.A. B. ed. पर्यंतच शिक्षण केलेल आहे. अगोदर पासूनच संसाराची धुरा सांभाळत जिल्हा परिषद ला तब्बल 30 वर्ष केंद्र प्रमुख म्हणून काम सुद्धा या आजीने केलं आहे. त्यामुळे संसाराचा गाढा यशस्वीरित्या ओढून झाल्यानंतर आपल्या निवृत्ती नंतर काहीतरी वेगळे करण्याची जिद्द घेऊन ह्या आजी गेल्या 3 वर्षापासून हा त्यांचा भारत भ्रमंतीचा प्रवास सुरु केला आहे. ह्या वयात काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा आजीबाईंना त्यांच्या आई कडून मिळाली असल्याचं आजीबाई सांगतात.अगदी 70 व्या वर्षी ठणठणीत दिसणाऱ्या सुपरआजीचा आदर्श प्रत्येक नवंयुवतींनी घ्यावा अस या आजीला वाटते, आजच्या या स्पर्धेच्या युगात महिलाही कुठे कमी नाहीत हाच संदेश घेऊन आजीबाईंनी हा भारत भ्रमंतीला निर्धार 70 व्या वर्षी केला आहे.नाथ प्लॉट खामगाव येथील रहिवासी असलेले योगेश जोगळेकर हे आजीचे एकमेव चिरंजीव आहेत,ते सध्या यवतमाळ येथे
mseb मध्ये ठेकेदारी करतात.आजी 21 जून रोजी निघाल्या आणि साधारण 22 जुलेला पोहचणार आहेतअगदी पावसाळ्याचा सुरवातीला हा भारत भ्रमंतीला प्रवास सुरु होऊन पुढे अनेक राज्य पार करत आजी दररोज शरीर साथ देईल तितका प्रवास करत असतात, व रात्री एखादी मौक्याची जागा पाहत विश्रांती घेतात, प्रत्येक गावात या आजीचं स्वागत केल्या जातं, ठिकठिकाणी या आजीला मदतही मिळत असते, त्यामुळे तब्बल 2000 किलोमीटर चा हा सायकल प्रवास आजीबाईंना आनंददायी वाटतो.प्रवासाला निघत असताना सकाळ पासूनच आजीबाईचे घरात पूजन करण्यात आले व आजीबाईंना निरोप देण्यासाठी वाजंत्री सोबत वाजतगाजत गावातून पुष्पहार घालून स्वागत करत आजीबाईंना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या , आजीबाईचा हा खडतर प्रवास त्यांना सुखाचा जाओ अशी प्रार्थना करण्यात आली. अनेकांनी आजीबाईंना भेटून आजीबाईंचे दर्शन घेऊन आजीबाईंना आर्थिक मदतही केली.
