गणेश महाजन @ एरंडोल तालुका प्रतिनिधी
एरंडोल चे लोकनियुक्त नगराध्यक्ष , रमेश परदेशी ह्यांनीं केलेल्या आवाहनानुसार ( त्यांनी स्वनिधीतून २१००० रुपये मदतनिधीत दिले आहे) आणी प्रांताधिकारी श्री विनय गोसावी ह्यांच्या संकल्पनेनुसार
एरंडोल ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी अशी ऑक्सिजन पाईपलाईन उभारणेसाठी लोकसहभागातून निधी उभारला जात आहे !
आमच्या सुखकर्ता फाउंडेशन कडून डॉ गीतांजली ठाकूर ( कोरोना आरोग्य दूत व माजी उपनगराध्यक्ष , एरंडोल ) ह्यांनी १५ जुलै रोजी ११००० रुपयांची रक्कम. मान . तहसीलदार अर्चना खेतमाळीस ह्यांच्याकडे सुपूर्द केली !
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णाना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे ! प्रशासन प्रयत्न करत आहे परंतु संकट मोठे आहे त्यामुळे ह्या तातडीच्या परिस्थितीत अश्या लोकसहभागाची गरज आहे !
एरंडोल तालुक्यातील व शहरातील अनेक दानशुर व्यक्ती , संस्था , संघटना व मंडळ , असोसिएशन ह्यासाठी पुढे येत आहे !
लढा कोरोनाशी !
डॉ गीतांजली ठाकूर ! Ch
कोरोना आरोग्य दूत
माजी उपनगराध्यक्ष , एरंडोल
