अहमदनगर जिल्ह्यातील खाजगी शाळा वारंवार फोनद्वारे विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क करून त्यांना चालू वर्षाची फी भरण्याची सक्ती करत असून ऑनलाइन फी ट्रान्सफर करण्याची मागणी करत आहेत.
मुळातच काही पालक कोरोनाच्या लॉकडाऊन परिस्थिती अत्यंत हलाखीचे दिवस जगत आहेत त्यांना मोबाईल मध्ये साधा बॅलन्स देखील टाकायला पैसे नाहीत तरी देखील असे पालक काहीतरी कष्ट करून दोन पैसे मिळवून आपल्या पाल्याच्या शिक्षणाची तमा बाळगत मोबाईल मध्ये बॅलन्स टाकतात व मुलांचे ऑनलाईन शिक्षण चालू करून देत आहेत त्यातही काही ठिकाणी रेंजची अडचण, काही पालकांकडे मोबाईल बॅलन्स चा अभाव, काही पालकांकडे चांगल्या मोबाईलचा अभाव असताना आता या खाजगी शाळा ऑनलाईन फी भरण्याची मागणी करताना पालक अगदीच हतबल झाले आहेत. याची दखल सरकारने घ्यावी व खाजगी शाळांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्याकरीता सरकारने लवकरात लवकर योग्य ती भूमिका घ्यावी यासंबंधातील निवेदनपर पत्र अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी मेल द्वारे मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे व त्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट नमूद केली आहे की काही बँकांकडून देखील ग्राहकांना वारंवार फोन करुन हप्ते भरण्याची मागणी करून हप्ते न भरल्यास आपणास व्याजदर लागेल अशा स्वरूपात फोन करून ग्राहकांना संभ्रमित करण्याचे काम बँकांकडून चालू आहे ,कोरोना पार्श्वभूमीवर सर्वच व्यवसाय बंद असल्यामुळे आज सर्वांवर उपासमारीची वेळ आली असताना आपण लॉकडाऊन काळातील बँकेचे हप्ते व व्याजदर माफ करीत त्या संबंधीचे आदेश त्वरित बँकांना द्यावेत असे निवेदनपर पत्रात दोन मुद्दे सरकारच्या निदर्शनास आणून देत अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या सह्यांनिशी अशा आशयाचे पत्र मा.रवींद्र दादा जाधव प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हाध्यक्षा रमादेवी धिवर मॅडम व युवक जिल्हाध्यक्ष निखिल भाऊ भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
सदर पत्रावर राहता तालुकाध्यक्ष शाम गाडेकर, उपतालुकाध्यक्ष रचना पाटणी, सरचिटणीस संकेत खामकर, कार्याध्यक्षा शबीस्ता सय्यद, उपकार्याध्यक्षा नीता गायकवाड, संघटक विश्वदीप पिंगळे, सहचिटणीस पवन शेजवळ, सचिव सुलतान सय्यद, शिर्डी शहराध्यक्ष आकाश जाधव इत्यादी अ.अ.नि.स.च्या विविध पदाधिकार्यांच्या सह्या आहेत.

