खुलताबाद प्रतिनिधी
खुलताबाद तालुक्यातील शूलीभंजन, नंद्राबाद परिसरात लावलेल्या एका फलकावरील नमूद केलेल्या आश्रमशाळाेला कुठल्याही प्रकारची परवानगी नाही, असा खुलासा समाज कल्याण विभागाने सामाजिक कर्यकर्ते राजेश थोरात यांनी केलेल्या तक्रारीनंतर केला आहे. सम्बंधित फलक लावणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी थोरात यांनी केली असुन तसे निवेदन समाज कल्याण विभागाला देण्यात आले आहे. या बाबत सविस्तार माहिती अशी की, खुलताबाद-औरंगाबाद महामार्गावर शूलीभंजन, नंद्राबाद परिसरात आश्रमशाळेचा फलक लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे त्या फलकावर वात्सल्य अनुसूचित जाती व जमाती मुलामुलींची शाळा असे नमूद केले आहे. सदरिल फलकाबाबत शंका आल्याने शूलिभंजन येथील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते राजेश थोरात यांनी 24 जून रोजी सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग औरंगाबाद यांच्याकडे लेखी स्वरुपात तक्रार केली होती.तक्रारीत म्हटले
आहे की,सदर शाळेत कर्मचारी भर्ती संदर्भात तोंडी व सोशल मिडियावर प्राचार देखील करण्यात येत असुन या शाळेस आपल्या विभाग अंतर्गत कोणत्याही प्रकारची मान्यता देण्यात आली याची चौकशी करण्यात यावी.जेणेकरुन नौकर भारतीच्या नावावर कुठलाही भ्रष्टाचार होणार नाही.याची दखल घेऊन आपल्या विभागाची परवानगी नसल्यास संबंधित संस्था चालकावर योग्य ती कारवाई करुन करुन गुन्हा दाखल करण्यात यावा.समाज कल्याण विभागाचा खुलासा सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग औरंगाबादकडुन राजेश थोरात यांना लेखी पत्र पाठवून खुलासा करण्यात आला आहे. या पत्रात असे म्हटले आहे की, शूलिभंजन येथे दाखवण्यात आलेल्या वात्सल्य अनुसूचित जातीच्या मुलामुलींच्या आश्रमशाळेला शासनामार्फत व या कार्यालय मार्फत कोणत्याही प्रकारची मान्यता देण्यात आलेली नाही. मात्र शासनामार्फत कोणत्याही प्रकारची मान्यता नसलेल्या आश्रमशाळेचा फलक कोणी लावला याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी थोरात यांनी केली आहे.