दर्यापूर प्रतिनिधी गौरव टोळे.
मा.मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती निमित्त १जुलै ते 7 जुलै पर्यंत मोठया प्रमाणात कृषी सप्ताह म्हणुन साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने कृषी संजिवनी सप्ताह" चे, आज आयोजन दर्यापूर तालुक्यातील मौजा रामगाव, नरदोडा येथे आयोजन करण्यात आले होते नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पा अंतर्गत , येणाऱ्या विविध योजना ,एकात्मिक कीड व्यवस्थापन, बीबीफ, कंटूूर बांधाचे फायदे, बदलत्या हवामानानुसार शेतीमद्ये करावयाचे बद्दल ,आणि उपाययोजना , व तसेच कृषी व कृषी संलग्न योजना यावर आधारीत कार्यक़्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाला कृषी सहययक व्ही. व्ही.पांडे सर, समूह साह्ययक- आनंद मेंढे,शेतीशाळा प्रशिक्षक विक्रम वाकोडे व इतर शेतकरी उपस्थित व्ही. व्ही.पांडे सर यांनी बदलणाऱ्या हवामान नुसार शेतीमध्ये करावयाचे महत्वाचे बद्दल आणि उपाययोजना ,व तसेच शेती व उद्योग, यांचे महत्त्व शेतकर्याना पटवून दिले व शेतीशाळे बद्दल, जिवाणू संवर्धक चा वापर करून करावयाची बीज प्रक्रिया व त्याचे फायदे, इ. माहिती देण्यात आली समूह सहययक आनंद मेंढे यांनी पोक़्रा अंतर्गत राबविण्यात येणार्या
कृषि व कृषि संलग्न वैयक्तिक योजनेची व सामूहिक लाभाच्या योजना तसेच गटशेती, महिला गट, शेतकरी उत्पादक गट, व इतर माहिती देण्यात आली, BBF पद्धत, सरी वरंबा पद्धत, बीज उगवण क्षमता, बीजप्रक्रिया इत्यादी बाबत माहिती दिली, कार्यक्रच्या शेवटी प्रगतशील शेतकरी महेंद्र टाले व युवा प्रगतशील शेतकरी हर्षल टाले, रामगाव येथील संदीप वसू यांच्या हस्ते जलपूजन करून गाव तलाव या ठिकाणी वृक्षारोपण करून प्रगतशील शेतकरी यांच्या पिकांचे सर्वेक्षण करण्यात आले, त्यानंतर सांस्कृतिक भवन येथे पुढील कार्यक्रम घेण्यात आला यावेळी रामगाव येथील प्रगतशील शेतकरी संदीप वसू, सुनील वसू बंडू भाऊ चारथड, रोजगार सेवक गजानन घुगलमाणे, गोपाल पाटिल वसू कृषी मित्र प्रमोद भाऊ चारथड, व कृषी ताई संगीताताई चारथड तर नरदोडा येथे श्री. बाबरावजी टाले, माजी उपसरपंच सुनील भाऊ चव्हाण, किशोर भोपळे, राहुल टाले, धनराज वानखडे, प्रतिभाताई टाले, आशाताई गायकवाड, कृषीताई अर्चनाताई भोपळे, प्रणिताताई बोरकर इतर शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते, यावेळी कार्यक्रमचाचे आभार प्रदर्शन आनंद मेंढे यांनी केले.
