शिवदास सोनवणे प्रतिनिधी
माळशिरस तहसीलदार कार्यालयाच्या समोर दुध दर वाढीच्या संदर्भात तीव्र आंदोलन करण्यात आले या वेळी पांडुरंगाच्या मुर्तीला दुग्धअभिषेक घालुन पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केली की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना सुदबुध्दी दे की दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाचा 35 रुपये भाव मिळावा आणि प्रतिलिटर दहा रुपये अनुदान मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.मागील सरकारच्या काळात माजी मंञी पशुसंवर्धन मंत्री
मा.महादेवरावजी जानकर असताना दुधाला 27 रू भाव व 5 रू अनुदान दिले होते आसा एकून 32 रू भाव दिला होता, जर या सरकारने आमची मागणी लक्षात घेऊन दुधाला भाव नाही दिला तर राष्ट्रीय समाज पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.या वेळी निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख यांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलनकर्ते यांचे निवेदन स्विकारले व सरकार पर्यत आपली मागणी पोहचवू आश्वासन देण्यात आले. यावेळी उपस्थित असलेले रासप नेते नितीनजी धायगुडे बाळकृष्ण लेंगरे (मामा) बाळासाहेब शिंदे ,दत्तात्रय
कोकरे ,सतीश कुलाळ बसिर काझी रणजित सूळ ,कविता माने ,शहीद मुलानी ,माऊली सरक ,शंकर शेंडगे अण्णासाहेब पांढरे ,अमरजीत जानकर सागर राऊत आदी उपस्थित होते.
कोकरे ,सतीश कुलाळ बसिर काझी रणजित सूळ ,कविता माने ,शहीद मुलानी ,माऊली सरक ,शंकर शेंडगे अण्णासाहेब पांढरे ,अमरजीत जानकर सागर राऊत आदी उपस्थित होते.


